Sanjay Raut | ‘मंत्री महोदय, ही धमकी समजायची का?’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. राज्य सरकार डरपोक आहे, पळकुटे आहे, असे राऊत म्हणाले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना षंड म्हटले होते. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना इशारा दिला होता. संजय राऊतांनी तोंड आवरावे, संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा काहीएक अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असे देसाई म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी ही धमकी समजायची का? असा प्रश्न देसाईंना केला आहे. (Sanjay Raut)

मंत्री महोदय, ही धमकी समजायची का? महाराष्ट्राच्या बाजूने लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर शांत आहे म्हणून जनता शांत बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील. हाच याचा अर्थ, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut)

संजय राऊतांवर टीका करताना देसाई म्हणाले, आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून तुरुंगाबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरील वातावरण तुम्हाला मानवत नाही असे दिसत आहे. म्हणूनच तुम्ही अशी वक्तव्ये करत आहात. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्ये करणे टाळा. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी एकप्रकारे संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात पाठवू, असा धमकीवजा इशाराचा दिला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढत आहोत. पण उगाच या वादाचा राजकीय फायदा घेतला जात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत षंड म्हणाले आहेत. त्यांचा मी धिक्कार करतो. समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असे असताना राऊतांनी षंड शब्द वापरला. संजय राऊत यांनी स्वतः लढ्यात उतरावे आणि मग मुख्यमंत्र्यांना बोलावे, असे देसाई म्हणाले.

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut is this a direct threat rautas question to shambhu raj desai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND vs BAN 2nd ODI | भारतीय संघाला मोठा धक्का; रोहित शर्माला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

Supriya Sule | ‘हे अजिबात चालणार नाही’ ! संसदेत सुप्रिया सुळे आक्रमक

LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा