Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सारवासारव – संजय राऊत

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर न्यास भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना काही कागदपत्रे पाठवली आहेत. ती योग्य ठिकाणी गेली आहेत. त्यामुळे आता त्यांची याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. तसेच शिंदे यांनी केलेल्या घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करत आहेत, असेही आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केले आहेत. राऊत दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी भाजप, मुख्यमंत्री शिंदे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर भाष्य केले. मुख्यमंत्री शिंदे यांचावर असलेले आरोप गंभीर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीला आले आहेत. ते का आले, माहीत नाही. पण नक्कीच ते नागपूर न्यास प्रकरणात आले असावेत. मुख्यमंत्री शिंदेनी 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना आपल्या मर्जीतल्या विकासकाला दिले. जे 16 भूखंड झोपडपट्टीधारक आणि गरीबांच्या घरांसाठी राखीव होते, त्यावर काही निष्कर्ष गिलानी समितीने काढले होते. या समितीने भूखंड वाटपाला विरोध केला होता. तरीही त्यावेळच्या नगरविकास मंत्र्यांनी त्या भूखंडाचे वाटप घाईघाईने केले. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. आता भलेही न्यायालयाचे 24 तासांत समाधान झाले असेल, तर तो भ्रष्टचार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी या वादात राऊतांनी अण्णा हजारे यांना घेतले आहे.
राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे शांत का आहेत? असा प्रश्न मी नाही
तर समाजमाध्यमातून विचारला जात आहे. सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला.
110 कोटींचे नुकसान झाले, 16 भूखंड फक्त 2 कोटींना विकासकाच्या घशात घातले.
तरी त्यावर कोणी काहीच बोलायला तयार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या घोटाळ्यावर
सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, अशी खोचक टीका राऊतांनी केली.
Web Title :- Sanjay Raut | sanjay raut press conference cm eknath shindes land scam devendra fadnavis trying to save him alleges raut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात
Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार