Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांचे गुरुवारी दि. 08 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे सत्ता कोणाची? याची सर्वांना उत्सुकता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. काँग्रेसचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले. त्यामुळे गुजरात भाजप राखेल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

गुजरातमध्ये काँग्रेसची मेहनत आणि यंत्रणा दोन्ही कमी पडली. लोकांच्या मनात कायम एक शंका असते की, मतदान कोणालाही केले तर निकाल भाजपाच्या बाजूने लागतो. त्यामुळे आपण घाई करायला नको. आपण निकालाची वाट पाहूया. भाजपवाले गुजरात हातून जाऊ देतील, असे मला वाटत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये अटीतटीचा सामना आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसने चांगली लढत दिली आहे. तिथे काँग्रेसने मेहनत घेतली आहे. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसची मेहनत आणि यंत्रणा दोन्ही कमी पडले, असे मत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

नुकताच दिल्ली महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला. यात आम आदमी पक्षाला मोठे यश मिळाले आहे.
दिल्ली महापालिका गेली पंधरा वर्षे भाजपच्या हातात होती.
ती त्यांच्या हातून खेचून घेण्यास आप यशस्वी झाला आहे.
यावेळी दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रदर्शनाबाबत विचारले असता, राऊत म्हणाले,
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम तुम्हाला लोकसभेत दिसेल. राहुल गांधींनी स्वत:चे नेतृत्व सिद्ध
केले आहे. या यात्रेतून त्यांनी देश ढवळून काढला आहे. त्याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसणार नाही.

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut reaction on gujarat himachal election result

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena Uddhav Thackeray Group | कोल्हापूरचे मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा नवा मल्ल; वंचितचे हाजी अस्लम सय्यद शिवबंधनात

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पूना क्लब, इव्हॅनो इलेव्हन संघांचा दुसरा विजय !