Sanjay Raut | दीपक केसरकरांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचे प्रतिउत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut | शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते विविध मुद्यांवरून एकमेकांसमोर उभे टाकलेले बघायला मिळाले. फुट पडल्यानंतर अनेकदा शिंदे गटाची विनवणी करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून झाला. पण त्यास वैयक्तिक मतभेदावरून नाकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्रित येण्यासंबंधीचे सुतोवाच केले होते. त्यांच्या याबाबतच्या वक्तव्याला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना दीपक केसरकर म्हणाले होते की, ‘जर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण केले तर शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही.’ त्यांच्या याच वक्तव्यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘दोन्ही गट एकत्र यावेत असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करायला हवं. दीपक केसरकरांनी जे विधान केले आहे, त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाले आहेत असं दिसत आहे. तसेच याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील म्हटले आहे की माझ्याच गटातले लोक माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरूनच तुम्ही याचा अर्थ समजावून घ्या. त्यांच्या गटात काय वाद सुरू आहेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे.’ असे मत संजय राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच हा गट फार काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही. या गटातील बरेच लोक भाजपमध्ये प्रवेश करतील. आणि तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. कारण आता त्यांना शिवसेना स्विकारणार नाही.’ असा खोचक टोला देखील त्यांनी शिंदे गटातील आमदारांना यावेळी बोलताना लगावला आहे.

तसेच दीपक केसरकरांनी एकत्र यायची जी भाषा केली आहे हे त्यांच्या गटातील वैफल्य आहे.
मी फेब्रुवारीमध्ये सरकार पडेल असं बोललो होतो. त्यामुळेच केसरकर आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत.
लवकरच १६ आमदार अपात्र ठरतील. आमची बाजू भक्कम आहे.
असेही संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut replied to deepak kesarkar on statement to uddhav thackeray selfexamination