Sanjay Raut | राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले – ‘आम्ही पाठीमागून नाही तर समोरून खंजीर खुपसतो’

पुणे / जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन –  Sanjay Raut | महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्ता स्थापन झाल्यापासुन भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात अनेक छोट्या-छोट्या कारणामुळे टिका-टिपणी होताना दिसतात. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. पूर्वी खंजिर खुपसने हा शब्दप्रयोग फक्त शरद पवारांवर होत होता. मात्र चंद्रकांत पाटलांना सांगतो बाबा, आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आाहे.

शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटलांचा खरपूस समाचार गखील घेतला. ते जुन्नर येथील कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन संजय राऊतांनी (Sanjay Raut) हल्लाबोल केला आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं होतं, शिवसेनेने केलेला विश्वासघात म्हणजे पाठीत खंजीर खुपसन होय.
सोबत राहायचं नव्हतं तर मग युती कशाला केली? शिवसेना फक्त मुंबईत होती त्याला भाजपने विदर्भ आणि मराठवाड्यात वाढवलं.
मात्र शिवसेनेने भाजपच्याच पाठीत खंजीर खुपसला अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

 

भाजपा प्रामाणिक मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढवेल
आणि जिंकेल ही. ज्यांनी मोदींच्या नावावर मते मागितली आणि आमचा विश्वासात केला अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला होता.
आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे निवडणुका लढवून त्या जिंकून दाखवू असंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, येथील कार्यक्रमात संजय राऊत म्हणाले, पूर्वी खंजिर खुपसने हा शब्दप्रयोग फक्त शरद पवारांवर होत होता.
मात्र चंद्रकांत पाटलांना सांगतो बाबा, आम्ही समोरून कोथळा काढतो मागून नाही.
पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Sanjay Raut | sanjay raut replies chandrakant patil saying shiv sena stabbed in front not in back

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vijay Wadettiwar | ‘तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली !

MLA Chetan Tupe | ‘शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम व्हावेत’ – आमदार चेतन तुपे

Beed News | वैद्यनाथ अर्बन बँकेच्या नितीन चितळेंना उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, जाणून घ्या प्रकरण