Sanjay Raut | संजय राऊतांचे भाजपला आव्हान, म्हणाले – ‘केंद्रीय तपास यंत्रणांची चिलखतं काढून मैदानात या, नाय मातीत गाडलं….’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | कोरोना सारख्या परिस्थितीतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घरातून काम करत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा पदभार दुसऱ्याकडे सोपवावा अशी भाजपने (BJP) टीका केली होती. त्याला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले होते. मात्र, त्यानंतरही टीका सुरुच होती. अखेर रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसैनिक संवादावेळीही त्यांनी भाजपवर शरसंधान साधले. त्यानंतर आज सकाळी पुन्हा मीडियाशी संवाद साधत संजय राऊत यांनी भाजपला थेट इशाराच दिला. ते म्हणाले, ”सीबीआय, ईडी, आयकरसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची चिलखतं काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, तर नाव सांगणार नाही…” असं त्यांनी म्हटले आहे.

 

संजय राऊत (Sanjay Raut) पुढे बोलताना म्हणाले, ”वर्दीत असल की कोणाच्याही अंगावर जाता येत नाही. वर्दी असलेला कुठलीही बेकायदेशीर कामे करतो हे आपण सिनेमात पाहतो. तशी ईडी, सीबीआय, आयकर विभाग ही केंद्रीय तपास यंत्रणा भाजपची चिलखतं आहेत. ती घालून ते लढत असतात. हिंमत असेल तर ती चिलखत काढून मैदानात या नाय लोळवलं तर आम्ही नाव सांगणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच सांगितल नाही की, युतीत 25 वर्षे सडली. भाजपला महाराष्ट्रात जमिनीवरून आस्मानापर्यंत नेण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. युतीचा धर्म आम्ही पाळला. पण जे झालं ते झालं. उद्धव ठाकरेंनी काल वेदना व्यक्त केल्या. केवळ शिवसेनाच नाही तर भाजपसोबत गेलेल्या पक्षांचेही हाल असेच झाले आहे,” असेही राऊत म्हणाले.

”तुम्हाला आम्ही घाबरत नाही, काय करणार तुम्ही ? आम्ही सर्वजण लढत आहोत. तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, आयटीफायटी सेलच्या माध्यमातून बदनामी कराल किंवा हरेन पंड्यांप्रमाणे गोळी माराल. दुसर काहीही करू शकत नाही तुम्ही शिवसेनेला (Shiv Sena) संपवू शकत नाही,” असे ठणकावून संजय राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut shivsena bjp uddhav thackeray shivsena mp sanjay raut open challenge to bjp over ed and cbi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा