Sanjay Raut | शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल; विरोधकांची टीका, संजय राऊत म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संसदेमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना खुर्ची देतानाचा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोवरुन विरोधकांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. या टीकेवरुन आता संजय राऊतही (Sanjay Raut) विरोधकांवर चांगलेच भडकले आहेत. ‘कुठेही राजकारण करू नका. शरद पवार हे पितृतुल्य आहेत. आणि त्या जागी लालकृष्ण अडवाणी किंवा इतर कुठलेही ज्येष्ठ नेते असते तरीही आपण खुर्ची आणून दिली असती. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना ही गोष्ट आवडली नसेल ती त्यांची विकृती आहे,’ असं राऊत म्हणाले.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘शरद पवार यांना आपल्या सारखं मांडी घालून बसता येत नाही. त्यांना त्रास होतो. यामुळे आपण त्यांना खुर्ची आणून दिली. पितृतुल्य वडिलधाऱ्या व्यक्तीला खुर्ची आणून दिली. शरद पवार यांच्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव किंवा इतर ज्येष्ठ नेते असते तरीही त्यांना खुर्ची आणून दिली असती. राजकीय विरोधक असले तरी ते ज्येष्ठ आणि पितृतुल्य आहेत. पण यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.

 

 

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘खुर्ची देणं सोडून द्या. पण अडवाणींना आपल्यासमोर उभं केलं नाही,
त्यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे गुरू त्यांच्याकडूनच मोठ्यांचे आदर करण्याचे संस्कार आपण घेतले. प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नये,’ असं म्हणत राऊत यांनी अपशब्द वापरला. अशाने महाराष्ट्रात तुमची सत्ता कधीच येणार नाही. तमुच्या डोक्यातला कचरा साफ केला नाही तर लोकं एखाद्या डंपिंग ग्राउंडमध्ये टाकून तुम्हाला गाडतील. असेच विचार असतील तर तुम्हाला फुले, आंबेडकर, शाहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

 

दरम्यान, राज्यसभेतील 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं.
यामध्ये काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे.
निलंबन मागे घ्यावे, यासाठी या निलंबित खासदारांचे संसदेच्या परिसरात धरणे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आंदोलकांना पाठिंबा दिला.
यावेळी राऊत यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. हाच फोटो व्हायरल झाला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut slams bjp over he carries a chair for ncp president sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा