Sanjay Raut | ‘काश्मिर फाईल्स’ चित्रपटानंतर काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) चे ज्युरी प्रमख नदव लॅपिड यांनी ‘दी काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ताशेरे ओढले. हा चित्रपट पूर्णपणे प्रचारकी आणि अश्लील आहे, असे लॅपिड यांनी म्हंटले आहे. त्यामुळे देशात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात एका राजकीय पक्षाचा प्रचार केला गेला आहे, तर दुसऱ्या राजकीय पक्षांच्या विरोधात मते मांडण्यात आली आहेत. या चित्रपटानंतर काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले आहेत, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

‘दी काश्मीर फाईल्स’ चित्रपटात एकाच पक्षाचा प्रचार करण्यात आला आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटात एकाच राजकीय पक्षाने (भाजप) गाजावाजा केला. त्यानंतर काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्या वाढल्या आहेत. गेल्या वर्षाभरात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले आहेत. या चित्रपटातून निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये कमावले. यातील काही रक्कम काश्मिरी पंडितांच्या अनाथ कुटुंबांना द्यावी, अशी मागणी आम्ही केली. मात्र, त्यावर ते काहीही बोलले नाहीत. त्यांनी जवळ जवळ या पैशातून काश्मिरी पंडितांना मदत करण्यास नकारच दिला आहे. ज्या राज्यांत भाजपाचे सरकार आहे, तेथे या चित्रपटाचा प्रचार भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता, असे संजय राऊत म्हणाले.

गोव्यात पणजी येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात इस्त्राईलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका करताना म्हंटले,
काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त झालो.
हा चित्रपट आम्हाला घाणेरडा, अश्लील तसेच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणे योग्य नाही.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut support iffi jury head nadav lapid comment on kashmir files film

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Prathamesh Parab | प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या ‘त्या’ मैत्रिणीने केलेली पोस्ट चर्चेत

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

Saleem Malik-Wasim Akram | ‘तो’ मला नोकराप्रमाणे वागवायचा; पाकिस्तानच्या माजी कॅप्टनवर वसिम अक्रम यांचा गंभीर आरोप