Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन | दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला सर्व राज्यांचे प्रतिनिधी जात असतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा नियोजीत दौरा रद्द केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut ) यांनी केला. तसेच मुख्यमंत्री देखील या दौऱ्यावरून लवकर परतणार असल्याची माहिती संजय राऊत(Sanjay Raut )यांनी दिली. त्यावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील गुंतवणुकीबाबत उदासिन असल्याचे देखील म्हटले.

यावेळी बोलताना संजय राऊत(Sanjay Raut ) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही तासांसाठी मुंबईमध्ये येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारिख विनंती करून बदलण्यात आली असती. मात्र मुंबई महापालिकेत शिवसेनेचा पराभव करणे हे एकमात्र लक्ष असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने तसे केले नाही. त्यांनी जर याबाबतची विनवणी पंतप्रधानांना केली असती तर त्यांनी तारिख बदलली असती. देशातील सर्व राज्याचे प्रतिनिधी दावोस येथे चालले आहेत आणि आमच्या राज्यातील सरकार हा दौरा रद्द करत आहे. त्यामुळे राज्यातील सरकार गुंतवणुकीबाबत गंभीर नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

केवळ पंतप्रधान मुंबईत येणार आहेत म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी दावोस दौरा रद्द केला. राज्यातील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना राज्यातील गुंतवणूकीपेक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चिंता लागली आहे. असा घणाघात त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर केला. राजकारण आधी नंतर महाराष्ट्र असा कारभार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. गुंतवणूक का एकदा निघूण गेली तर ती परत येत नाही. जनतेला हे सगळे माहित आहे. असे म्हणत त्यांनी(Sanjay Raut ) शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

येत्या १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या दौऱ्यासंबंधीच्या तयारीबाबत एक आढावा बैठक घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या या मुंबई दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमीपुजन करणार आहेत.
त्यात मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ सह ते मुंबई मेट्रोच्या दोन नव्या मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत.
(Sanjay Raut )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १५ जानेवारीला दावोस दौऱ्यावर जाणार होते.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजीत दौऱ्याप्रमाणेच दावोसला जातील पण ते १८ जानेवारीला परत
मुंबईत दाखल होणार आहेत. मात्र यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यामुळे
आपला नियोजीत दावोस दौरा रद्द केला आहे. (Sanjay Raut )

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut target eknath shinde devendra fadnavis for canceling davos tour due to pm narendra modi mumbai visit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदेंसोबत बंद दाराआड अडीच तास चर्चा, प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाला धक्का देणार?

Pune Crime News | वीजेचा धक्का लागून मुलाच्या मृत्यु प्रकरणी महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

Yerwada Jail Exhibition | कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’वर, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची माहिती