×
Homeताज्या बातम्याSanjay Raut | संभाजीराजे आणि उदयनराजे यांची मागणी म्हणजे लोकभावना'; संजय राऊत...

Sanjay Raut | संभाजीराजे आणि उदयनराजे यांची मागणी म्हणजे लोकभावना’; संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सध्या चोहोबाजूंनी टीका होत आहेत. राज्यपाल यांना पदावरून हटविण्याची मागणी देखील सर्व बाजूंनी जोर धरत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर घेतलेल्या भूमिकेविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांनी जी भूमिका घेतलेली आहे, ती भूमिका म्हणजे लोकभावना आहे. (Sanjay Raut)

 

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानावर अद्याप कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील, तर उठाव होणारच, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हंटले होते. त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच उदयनराजे भोसले यांनी पक्षाला पत्र पाठवून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना हटविण्याची मागणी केली आहे. (Sanjay Raut)

त्यामुळे त्यांची ही मागणी लोकभावना असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. राज्यपालांचे कार्यक्रम जेथे होतील,
ते आम्ही उधळून लावू. ही लोकभावना आहे. अद्याप महाराष्ट्राने संयम राखला आहे आणि दुसरीकडे राज्यपालांचा आणि सुधांशू त्रिवेदींचा बचाव केला जात आहे. या महाराष्ट्रात असे कधी घडले नव्हते, असे देखील राऊत म्हणाले आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांच्या लिखाणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला,
त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती. त्यांनी ते देशाचे पंतप्रधान असताना देखील माफी मागितली होती.
मोरारजी देसाई हे देखील मोठे नेते होते. त्यांचा आणि महाराष्ट्राचा वाद आहे.
त्यांच्याकडून देखील शिवाजी महाराजांवर काही चुकीची विधाने केली गेली होती.
त्यांनी देखील शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना मानणाऱ्या लोकांची माफी मागितली होती.
प्रत्येकाने माफी मागितली. पण, भाजपचे हे टगे माफी मागायला तयार नाहीत.
ते शिवाजी महाराजांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र यांना वेळ आल्यावर त्यांची जागा दाखवून देईल, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay rauts reaction to the role of chhatrapati sambhaji raje udayan raje

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Yami Gautam | यामीला बनायचे होते IAS पण वडिलांच्या ‘त्या’ मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

Pune NCP | रामदेव बाबांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची गुडलक चौकात निदर्शने

Sanjay Raut | ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’; ‘मुख्यमंत्री 40 रेडयांचे बळी…’ – संजय राऊत

Must Read
Related News