Sanjay Raut | ‘… म्हणून बोम्मईंची जीभ चालते आहे’ – बोम्मईंना संजय राऊतांचे प्रत्त्युतर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या विधानसभेत गुरुवारी एक ठराव मांडण्यात आला होता. हा ठराव एकमताने पारित झाला. विशेष म्हणजे याला विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिला. यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत हे देशद्रोही असून, ते चीनचे दलाल आहेत, असे बोम्मई म्हणाले होते. यावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी (Sanjay Raut) बोम्मई यांना प्रत्युत्तर दिले आहे.
चीनने ज्याप्रमाणे भारतात घुसखोरी चालवली आहे, त्याचप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्रात घुसखोरी करत आहे. त्यामुळे आम्हालाही आता तोच मार्ग पत्करावा लागेल, असे माझे मत आहे. कर्नाटकच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना जर चीन विषयी एवढा तिटकारा आहे, तर त्यांनी अगोदर त्यांच्या पंतप्रधानांचा निषेध करावा. नरेंद्र मोदींनीच चीनसाठी दरवाजे उघडले आहेत. आणि मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्र कर्नाटक वादात तेल ओतत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या दोन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टी बोम्मई मानायला तयार नाहीत आणि आता ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहेत. आम्हाला त्यांनी संस्कृती आणि संस्कार सांगण्याची गरज नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
तसेच आज बोम्मईंची जीभ चालते आहे, कारण शिंदे-फडणवीस शांत आहेत. विधानसभेत चर्चेचे विषय मागे पडून अनावश्यक विषय चर्चेत येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार ज्याप्रमाणे गुरुवारी व्यक्तीगत विषयांवर बोलत होते, त्यांना कर्नाटकने मंजूर केलेल्या ठरावाची कल्पना नसावी? हेच त्यांचे महाराष्ट्र प्रेम. कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राला एक इचंही जमीन देणार नाही, असा ठराव मांडला. मुळात आम्हाला एक इंच जमीन नको, आम्हाला आमच्या हक्काचे बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर गावे हवी आहेत. हा आमचा कायदेशीर दावा आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या विषयावर तोंड शिवून बसलेले आहेत, असेही राऊतांनी नमूद केले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद बोम्मईंनी पूर्णपणे त्यांच्या राजकीय हेतूने निर्माण केला आहे.
आम्ही चीनचे दलाल आहोत, तर मग तुम्ही कोणाचे आहात? जर त्यांना बोलण्याचा घटनात्मक अधिकार आहे,
तर आम्हालाही सीमावासीयांच्या हक्काबाबत बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्रवर तुम्ही हक्क सांगता,
त्याला विरोध करण्याचा घटनात्मक अधिकार आम्हाला आहे.
कर्नाटक राज्याच्या विधानसभेत ज्याप्रमाणे महाराष्ट्राविरोधात निषेध ठराव मंजूर झाला,
त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेही कर्नाटक विरोधात विधानसभेत निषेध ठराव मंजूर करावा, अशी मागणी यावेळी राऊतांनी केली.
Web Title :- Sanjay Raut | sanjnay raut replied bommai china agent statement criticized shinde government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | …त्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत आहोत – रोहित पवार
Aditi Tatkare | सभागृहात सत्ताधारी पक्षाचे लोकच कामकाजात खोडा घालत आहेत – अदिती तटकरे