Shiv Sena Bhavan | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, म्हणाले – ‘शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राम मंदिराच्या (Ram temple) मुद्द्यावरून भाजपा कार्यकर्ते अन् शिवसैनिकांमध्ये (BJP-Shiv Sena POlitics) बुधवारी (दि. 16) शिवसेना भवनसमोर (Shiv Sena Bhavan) तुफान राडा झाला होता. दरम्यान यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता काल मिळालेल्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच राऊतांनी भाजपला दिला आहे. यापुढे जर शिवसेना भवनाकडे कुणी डोळे वर करून पाहिले तर असेच उत्तर दिले जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. sanjay raut says shiv sena bhavan symbol maharashtras identity if you walk it you will get shivbhojan thali

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले की, राम मंदिर जमीन गैरव्यवहार प्रकरणात (Ram temple land abuse case) भाजपावर किंवा भाजपाच्या नेत्यांवर आरोप झाले नाहीत.
राम मंदिर ट्रस्ट (Ram Mandir Trust) ही स्वायत्त संस्था आहेत.
अस्मितेचे प्रतीक असलेल्या वास्तूवर आरोप होत आहे.
त्यावर आरोप होत असेल तर त्याबाबत प्रश्न विचारणे खुलासा मागणे हा गुन्हा आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

दरम्यान राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली.
त्या भूमिकेविरोधात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला.
भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले.
शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी शिवसेना भवनापासून साधारण अर्धा किलोमीटरवरच या आंदोलकांना अडवले.
त्यानंतर युवा मोर्चाच्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आपल्या वाहनातून पोलीस ठाण्यात नेले.

 

Web Title : sanjay raut says shiv sena bhavan symbol maharashtras identity if you walk it you will get shivbhojan thali

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Maharashtra Government। ओबीसी आरक्षण आदेशाच्या अंमलबजावणीस तूर्त स्थगिती द्या