Sanjay Raut | हा ट्रेलर होता… पिक्चर अभी बाकी है ! पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. शिवसेना भवन आहे, बाळासाहेबांकडून प्रेरणा घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्र आहे. तुम्ही काहीही करा हम झुकेंगे नही, कोणत्याही परिस्थिती महाराष्ट्रात ठाकरे सरकार (Thackeray Government) राहील. 2024 मध्ये देशात परिवर्तन होईल, मला जे बोलायचं होतं ते बोललो. कहाणी अभी पुरी नही हूई, हा ट्रेलर (Trailer), येत्या काळात काही व्हिडीओ, डॉक्युमेंट समोर आणेन. दिल्लीत जा किंवा ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्याकडे जा, माझं आयुष्य संघर्षात गेलं, बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठिशी आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.

 

तर मला पकडा, पण
ईडीच्या अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या. अमित शाह (Amit Shah), मोदींना विनंती आहे… हीच आहे का तुमची लोकशाही ? तुम्ही भाषणं देता, अशा पद्धतीने धमक्या देताय, मुलांना टार्गेट करातय. मी अमित शहांना फोन केला होता त्यांना म्हटलं की, जे चाललंय ते योग्य नाही, माझ्याशी शत्रूत्व असेल तर मला पकडा, पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना का त्रास देताय. तुमच्या संस्था आमच्या मुलांना का छळतायत ? असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

जितेंद्र चंद्रलाला नवलानी कोण आहे ?
ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या.. मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू… तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी (Jitendra Chandralal Navlani) कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल. चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसं याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शहांना (Amit Shah) देणार आणि त्यानंतर तुम्हाला सागेन… जितेंद्र नवलानी, फरिद शमा (Farid Shama), रोमी (Romi) आणि फिरोज शमा (Feroz Shama) कोण ?

मुंबईतील 60 लोकांनी 300 कोटी जमा केले. कुठं झालं मनी लाँड्रिंग (Money Laundering) आणि ईडीचे लोक कुठं बसतात काय करतात ? हे मी देशाला सांगेन. मला गोळी मारा, जेलमध्ये टाका काहीही करा मी घाबरत नाही.

नील सोमय्य यांना अटक करा
पीएमसी बँक घोटाळ्यात (PMC Bank Scam) किरीट (Kirit Somaiya) आणि नील सोमय्या (Neil Somaiya) यांना ताबडतोब अटक करा. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे, सगळे पेपर्स मी ईडीकडे तीन वेळा दिले. गेल्या तीन महिन्यात किमान तीन वेळा ईडी कार्यालयात पाठवले. तुम्ही एक दोन गुंठेवाल्यांना बोलवता. किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही आणि खिचडी खात असल्याचे मी बघितलं, असेही राऊत म्हणाले.

राकेश वाधवान पीएमसी घोटाळ्यातील आरोपी
राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. बारच मोठा बिल्डर आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. त्याच्या खात्यातून भाजपच्या खात्यावर 20 कोटी गेलेत, हे सर्वांना माहितीय. ईडी वालो सुनो, माझं बोलण आज ऐकावं लागेल. ईडी आणि सीबीआय (CBI) पंतप्रधान आणि गृहमंत्री आज माझं बोलणं ऐकतायत हे मला माहितीय.

सोमय्या म्हणतात की राकेश वाधवान भयंकर माणूस आहे. घोटा केला म्हणतात. पण निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे, ही कंपनी सोमय्यांची आणि त्यांच्या मुलांची आहे. तो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. त्यांचा वसईत प्रकल्प आहे. पीएमसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी असलेल्या वाधवानकडून कोट्यावधी रुपयांची जमिन लाडानीच्या नावावर घेतली. रोख रक्कम सुद्धा घेतील ही रक्कम 80 ते 100 कोटींच्या घरात आहे. वसईत 400 कोटी रुपयांची जमिन साडेचार कोटी रुपयांना घेतल्याचा खुलासा राऊत यांनी केला.

दुधवाला 7 हजार कोटींचा मालक कसा बनला ?
मला कुणीतरी सांगितलं की जिथं तुम्ही कपडे शिवले तिथेही ईडीवाले गेले. ईडीचे लोक टेलकरडेसुद्धा गेले.
किती पैसे दिली, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचं बाकी राहिलंय.
तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला 7 हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा ? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचं सरकार (BJP Government) आलं, तेव्हापासून महाराष्ट्रात येणं जाणं सुरु झालं.
भाजपच्या नेत्यांच्या घरात येणं जाणं सुरु होतं आणि त्याची संपत्ती वाढली.
कोणी केलं मनी लॉड्रिंग, 7 हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेले.
महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झालं.
महाष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळातला असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

मुलीच्या लग्नाचा हिशोब करतायत
मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला हे लोक लागले आहेत. हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले.
किती पैसे दिले अशी विचारणा केली.
गुजरातमध्ये एवढा मोठा घोटाळा झाला याचे काहीच नाही.
भाजपच्या एका मंत्र्यांच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला.
त्यात कार्पेट टाकलेलं त्याची किंमत साडेनऊ कोटी होती. घरात शिरायचं नाही, पण तुम्ही आमच्या घरात शिरताय,
मुलांच्या, नातेवाईकांच्या घरात शिरताय. जेलमध्ये टाकणार आहात, टाका.. पण माझ्यासोबत तुम्हीही असणार आहात, असा इशारा त्यांनी दिला.

 

ईडीचा तपास गंमतीचा
माझ्या आयुष्यात कधीच चुकीचं काम केलं नाही. 20 वर्षांचे स्टेटमेंट घेऊन गेले. ईडीचा तपास गंमतीचा आहे.
माझं गाव अलिबाग, माझी जमिन अलिबागला (Alibag) असेल ना, मॉरिशिअसला नसेल.
50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. 50 गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी तिथल्या गावात नातेवाईकांना पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं. संजय राऊत यांच्या विरोधात लिहून दे, तुला किती कॅश दिली अस त्यांना धमकी दिली.
गरीब लोक घाबरतायत ते, 12-14 तास त्यांना बेकायदा डांबून ठेवलं. कोणत्या कायद्याने कोणता तपास करताय, किती तपास पडलाय ईडीसमोर असेही राऊत म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | shiv sena leader and MP sanjay raut press conference bjp ed nia in mumbai bjp leader kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा