Sanjay Raut | संजय राऊतांना ‘एवढ्या’ दिवसांची ED ची कोठडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर ईडीकडून (ED) रात्री उशिरा अटक (Arrest) केली. रविवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर ईडीकडून त्यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापूर्वी राऊत यांना आज सकाळी जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी नेण्यात आले. न्यायालयाने संजय राऊत (Sanjay Raut) यांना 4 दिवसांची ईडीची कोठडी (ED Custody) सुनावली. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे (Justice M.G. Deshpande) यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

 

मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) रविवारी सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या (Sanjay Raut) भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होते. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 12.04 वाजता अटक करण्यात आली. आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामिन मिळणार की कोठडी याकडे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. संजय राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी (Senior Advocate Ashok Mundargi ) यांनी न्यायालयात बाजू मांडली. हितेन वेणेगावकर (Lawyer Hiten Venegaonkar) यांनी ईडीच्या वतीने युक्तिवाद केला.

संजय राऊत यांना आज सत्र न्यायालयात (Session Court) हजर केलं, कोर्ट रुम नंबर 16 मध्ये न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीनं रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केलं.
त्यानंतर ईडीने त्यांची न्यायालयाकडे 8 दिवसांची कोठडीची मागणी केली.
मात्र राऊतांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर 8 दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती.
त्यानंतर न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

 

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
संजय राऊत हे एक व्यावसायिक आहेत, असा युक्तिवाद संजय राऊतांच्या वकिलांमार्फत करण्यात आला.
कोठडी द्यायची असेल तर कमी दिवसांची द्या, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केली. राऊतांच्या अनेक कंपन्या आहेत.
सर्व पैसे कायदेशीररित्या आले आहेत, असा दावाही यावेळी करण्यात आला.

 

Web Title : – Sanjay Raut | shiv sena leader sanjay raut has been granted ed custody by the court for till august 4 in the patra chawl case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा