Sanjay Raut |  ‘…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते’ – संजय राऊत

0
300
Maharashtra Political Crisis shiv sena strategizes lays ground for long war ahead maharashtra political crisis
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे यांचा प्रश्न काय, तर त्यांना मुख्यमंत्री (CM) व्हायचे आहे. हा हिंदुत्व (Hindutva) वगैरे विचार, हे सर्व फोडणी आहे. त्यांना मुख्यमंत्री करण्यापासून रोखलं कोणी, तर भारतीय जनता पक्षाने. भाजपने (BJP) 2019 मध्ये शब्द पाळला असता, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद किंवा 50 – 50 पॉवर शेअरिंग, त्यात मुख्यमंत्रीपद सुद्धा होत. त्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री होते. भाजपने बेईमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि आता त्याच भाजपसोबत जे जायला निघाले, असे शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, उद्धव ठाकरे हे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले, ते एका विशिष्ट परिस्थितीत ते मुख्यमंत्री झाले. तीन पक्षांचं सरकार आहे. तिन्ही भिन्न विचारांचे पक्ष आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नावाशिवाय दुसरं नाव दिसलं नाही. तेव्हा आम्ही त्यांना आग्रह केल्याचंही ते म्हणाले. शिवसेना भाजपमध्ये अडीच वर्षाचा जो काही करार होता तो झाला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. विधीमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री झाले असते, असंही ते म्हणाले.

 

कोणत्याही परिस्थितीत सरकार बनेल

कोणत्या परिस्थितीत हे सरकार बनले, हे सर्वांना माहित आहे. आम्ही गेले 25 वर्ष हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप सोबत होतो.
2014 साली हिंदुत्ववादी पक्ष असताना ही भाजपने आमच्याशी युती (Alliance) तोडली.
तेव्हा हे सर्व आमच्या सोबत होते. त्यावेळी यामधील एकानेही काही म्हटले नाही. मी सोडून. मीच यासाठी भांडत होतो.
निवडणूक तेव्हा झाली आम्ही जिंकलो, पुन्हा युती झाली. तेव्हाही हे लोक सरकारमध्ये गेले. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. मी त्यांच्या विषयी फार टोकाची टीका करेल किवा काही, असं काही नाही. ते माझे जवळचे मित्र आहेत. आमचं भावनिक नाते सुद्धा आहे. इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आठ दिवसांपूर्वी आम्ही दोघे एकत्र अयोध्येत होतो.

 

Web Title :- Sanjay Raut | shiv sena leader sanjay raut speaks on eknath shinde chief minister shiv sena bjp alliance maharashtra political crisis today marathi news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा