चलो अयोध्या ! CM ठाकरे ‘या’ दिवशी घेणार रामलल्लाचे दर्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली आहे. राम मंदिर उभारणीची घोषणा झाल्यानंतरच उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार होते मात्र त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता त्यामुळे आता त्यांनी पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.

विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपला पूर्वनियोजित अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला होता. म्हणून आता सत्ता स्थापनेनंतर लगेचच त्यांनी अयोध्येच्या दौऱ्याची आखणी केल्याचे समजते. अयोध्येचं कोणीही राजकारण करू नये. हा आमच्या श्रद्धेचा भाग, याचं राजकारण नको असे यानिमित्त संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रामलल्लाचं दर्शन घेतील, शरयू तीरावर आरती करतील असे देखील राऊत यांनी सांगितले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन सहकुटुंब घेतले होते. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतील असे काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like