Sanjay Raut | ‘होळी वर्षातून एकदा येते, मात्र भाजपवाल्यांचा शिमगा दररोज’, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. भाजप उडवत असलेले रंग नकली आहेत. अशा रंगांवर केंद्र सरकारचीही (Central Government) बंदी आहे, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. भाजपच्या रंगात भेसळ (Color Adulteration) आहे. त्यांच्या आरोपात (Allegations) भेसळ आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या या रंगांना घाबरत नाही, असे संजय राऊतांनी सांगितले. देशात होळीचा सण (Holi Festival) उत्साहात साजरा होत असताना राऊतांनी राजकीय रंग उधळले आहेत.

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हणाले, होळी वर्षातून एकदा येते, मात्र भाजपवाल्यांचा शिमगा दररोज सुरु आहे. राज्यात दररोज खड्डे खणता येतील, पण आम्ही ते करत नाही. आम्ही खड्डे खणायला सुरुवात केली तर त्यात कोणकोण पडेल, हे देखील बघितलं जाईल असे राऊत म्हणाले.

 

भाजपच्या दंडात ताकद नसल्याने ते पाठिमागून हल्ले करत असून तशी त्यांची सवय आहे.
सध्या गोवा (Goa) जिंकल्याने त्यांचे मनोबल वाढले. पण गोवा पोर्तुगीजांना (Portuguese) कळलं नाही, इंग्रजांना (British) कळलं नाही.
त्यामुळे भाजपला आता लवकरच कळेल, असा टोला त्यांनी लगावला.

 

राजू शेट्टी (Raju Shetty) हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन (Agitation) करत आहेत.
त्यांना पाठिबा दर्शविण्याची तयारी संजय राऊतांनी दाखवली आहे.
राजू शेट्टी यांनी दिल्लीत जंतरमंतरवर (Jantar Mantar) आंदोलन केलं पाहिजे असा सल्ला दिला.
तसेच आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut alleges bjp over rd raids

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा