Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं बंडखोर आमदारांना खुले आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आल्याचे चित्र आहे. शिंदे गटाकडे 40 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, बंडखोरी झाल्यानंतर पहिले दोन दिवस शिवसेना नेत्यांनी संयमाची भूमिका घेतली होती, विनंती करत होते. मात्र, शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर आता नेत्यांनी सुद्धा बंडखोरांना रोखठोक भाषेत सुनावण्यास सुरूवात केली आहे. आज शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोरांना खुले आव्हान दिले आहे.

 

शिवसैनिक इशार्‍याची वाट पहातायेत

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असे म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर खुपसत नाहीत. जे व्हायचे ते होऊ द्या. जे करायचे ते करा. मुंबईत तर यावे लागले ना ? तिथे बसून आम्हाला सल्ला – मार्गदर्शन करत आहेत. लाखो शिवसैनिक जमिनीवर आहेत. आमच्या एका इशार्‍याची वाट पाहात आहेत. पण आम्ही अजूनही संयम ठेवला आहे. त्यामुळे कोण शक्तीप्रदर्शन करत आहेत, कोण काय करतेय त्याने काही फरक पडत नाही. (Sanjay Raut)

 

संजय राऊत म्हणाले, वेडे आहेत ते लोक. कोणत्या नशेत आहेत माहिती नाही. त्यांना खाण्यातून अफू, चरस, गांजा देतात काय कुणास ठाऊक. अडीच वर्षांपासून सत्तेत आहेत. सगळे मंत्री बनून बसले आहेत. मलईदार खाती त्यांच्याकडे आहेत. आता अचानक त्यांना साक्षात्कार झाला का ?

 

राणे निवडणुकीला सामोरे गेले, मी त्यांना मानतो

बंडखोरांना आव्हान देताना संजय राऊत म्हणाले, जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या.
मी नारायण राणेंना (Narayan Rane) मानतो. त्यांचा गट लहान होता.
पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांचे 22 लोक फुटले.
त्यांनी राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवले.

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्या. कितीही असू द्या. 54 असू द्या.
राजीनामे द्या आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझे खुले आव्हान आहे.
तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवू नका.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut challenge to eknath shinde group on election Maharashtra Political Crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा