Sanjay Raut | ‘पैसे जपून खर्च करा, तुम्ही चिकन खरेदी केलंत तरी भाजपा ईडीला कळवेल’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांवर मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा लागला आहे Enforcement Directorate (ED). या कारवाईवरुन भाजप (BJP) आणि आघाडी सरकारमध्ये राजकीय शीतयुद्ध चांगलंच रंगताना दिसत आहे. तसेच भाजपवरही जोरदार आरोप केला जात आहे. यावरुन आता शिवसेना नेते आणि खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे.

 

यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ”महाराष्ट्रातल्या जनतेवर भाजपा पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. थोडे जरी पैसे खर्च केले तरी भाजपा लगेच ईडीला (ED) कळवेल, असा टोला त्यांनी लगावला. तसेच,”पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपाचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतले, आज किती घेतलं यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवं,” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”राज्य सरकारचे आदेश असूनही अनेक राज्यांमध्ये अजानवरचे भोंगे उतरलेले नाहीत. त्यात भाजपशासित राज्याचे प्रमाणही जास्त आहे. मी गोव्यात होतो, तिथेही मी अनेकदा अजान ऐकायचो, उत्तर प्रदेशातले भोंगे तसेच आहेत. काल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यांचं पालन व्हायला हवं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut enforcement directorate ed bjp in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा