Sanjay Raut | ‘चंद्रकांत पाटलांच्या ‘या’ विधानामुळे मोदींची 2 तासांची झोपही उडाली असेल’; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) येऊन अडीच वर्षे पूर्ण झाली. या अडीच वर्षाच्या कालावधीत शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यातील आरोप – प्रत्यारोप, दावे – प्रतिदावे, टोमणे – प्रतिटोमणे असा कलगीतुरा सुरुच आहे. अद्यापही रोज नवनवीन अंक समोर येत आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा फटकेबाजी सुरु झाली आहे. शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’मधील रोखठोक या सदरामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन खोचक टोला लगावला आहे. तसेच ही चमचेगिरी असल्याचे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका देखील केली आहे.

 

काँग्रेसच्या काळात चमचे होते
‘मालिक तो महान है बस चमचों से परेशान है’ असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रोखठोक सदरातून खोचक टोले लगावले आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेसच्या (Congress) काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. केवळ नामांतर झाले. काम तेच, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देवकांत बरुआ (Devkant Barua) यांनी इंदिरा इज इंडिया (Indira is India) म्हटल तर मोदी भक्तांनी मोदी इज इंडिया (Modi is India) असं जाहीर केलं. जे मोदींबरोबर नाहीत, ते देशाबरोबर नाही, असं टोक भक्तांनी गाठल्याचे राऊत यांनी लेखात लिहिलं आहे.

 

मोदींची झोप उडाली असेल
चंद्रकांत पाटील यांनी मागील आठवड्यात एका विधानाचा संदर्भ घेऊन संजय राऊत यांनी त्यांच्यावर आणि भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांनी आता कडेलोट केला आहे. पाटील हे अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवत सांगितलं नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात आणि फक्त दोनच तास झोपतात. आता ही दोन तासाही झोप येऊ नये, म्हणून प्रयत्न सुरु आहेत. पाटलांची ही विधान ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदीची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना एवढं बळ येतं कुठून ? हा संशोधनाचा विषय आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

तर मग रशिया – युक्रेन युद्ध का पेटलं ?
या लेखामध्ये संजय राऊत यांनी रशिया – युक्रेन युद्धावरून (Russia – Ukraine War) देखील मोदींना टोला लगावला आहे. युद्धात मोदींना कसं ओढायचं, यावर भक्त मंडळींमध्ये प्रचंड खल झाला. अखेर एक दिवस भक्तांच्या वृत्तवाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर वृत्त झळकलं. मोदींनी पुतीन (Putin) – बायडेन (Biden) यांच्याशी एक तास चर्चा केली. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी (Ukraine President) मोदींकडे मदत मागितली. मोदींचा सल्ला पुतीन – बायडेन यांनी मानल्याचंही प्रसारित झालं. पण सत्य असं, की पुतीन यांनी युक्रेन बेचिराख केलं आहे. पुतीन – बायडेन हे मोदींच्या ऐकण्यातले होते, तर मग रशिया – युक्रेन युद्ध का पेटलं ? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

 

स्वर्गातील देवांचीही झोप उडाली असेल
चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर स्वर्गात देवांचीही झोप उडाली असेल, असं राऊत यांनी लेखात म्हटले आहे.
जे राज्य चमचे निर्माण करतात, ते चमच्यांचे बनते. त्यातून अंधभक्तांची फौज निर्माण होते. मोदी चंद्रकांत पाटलांचे देव आहेत.
देवांनाही चमचे होते. पण देव झोपत नव्हते असं चमचे म्हणाले नाहीत. मोदी अखंड जागे राहतील असं जाहीर करण्यात आल्याने स्वर्गात देवांचीही झोप उडाली असेल.
देवांची झोप उडवण्याची ताकद चमच्यांत आणि भक्तांत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut mocks chandrakant patil bjp on narendra modi sleep statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा