Sanjay Raut | ‘वेट अँड वॉच’, ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊतांचे सूचक ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्याने नवनवीन घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी झाला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झालेला नाही. यासोबतच बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) अपात्रतेची टांगती तलवारही आहे. यावरून विरोधक सातत्याने टिका करताना दिसत आहेत. तर शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट करत टोला लगावला आहे.
आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात, उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है ! यासोबत सगळ्यात शेवटी ‘वेट अँड वॉच’ असं म्हटलं आहे.
बहुमताचं पत्र राज्यपालांना देत असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर भाजप (BJP) नेत्यांचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे.
उनकी मुस्कुराहट पर न जाना,
दिया तो कब्र पर भी जल रहा है!!
Wait and watch. pic.twitter.com/rMZnNILHs1— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2022
शनिवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी लिहिले, बार्बाडोसची लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे.
मात्र तरीही त्यांच्या मंत्रिमंडळात 27 मंत्री आहेत.
महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असूनही इथे 2 मंत्री हवे तसे निर्णय घेत आहेत.
इथे राज्यघटनेचं (Constitution) पालन होतंय का ? जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) यासंदर्भात निर्णय देत नाही,
तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut new tweet president rule maharashtra government cm eknath shinde devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update