Sanjay Raut | ईडीकडून संजय राऊत यांची 9 तास चौकशी, कार्यालयाबाहेर येताच म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांची तब्बल 9 तासापासून ईडीकडून चौकशी (ED Inquiry) झाली. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patrachal Land Scam) ईडीने त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. त्यानंतर आज त्यांची चौकशी केली. ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांची दुपारी बारा वाजल्यापासून रात्री दहावाजेपर्यंत चौकशी केली. चौकशी दरम्यान ही जमीन कुठे आहे हेसुद्धा आपल्याला माहित नसल्याचा दावा त्यांनी केला होता.

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीने नऊ तास चौकशी केल्यानंतर ते कार्यालयाबाहेर आले. त्यांनी माझ्याकडून ईडीला पूर्ण सहकार्य केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. केंद्राची तपासयंत्रणा आहे, सहकार्य केलं, त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी दूर केल्या पाहिजेत. माझ्याकडून पूर्ण सहकार्य केलेलं आहे, असे राऊत यांनी सांगितले.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?
मुंबईतील गोरेगावमध्ये (Goregaon) ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत (Praveen Raut) यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी (Messrs. Guru Ashish Construction Company) पुढे आली. राकेश वाधवान (Rakesh Wadhwan), सारंग वाधवा (Sarang Wadhwan) न आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत (MHADA) कंत्राट झालं. मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला. गुरु आशिष कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा केली.

 

मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली.
ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे.
त्यापैकी प्रवीण राऊत त्यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली.
या 100 कोटीपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनी दिल्याचे समोर आले.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut patrachawl case ed investigation 9 hour

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | अबब…शिंदे गटाच्या गुवाहाटीतील 8 दिवसाच्या फक्त जेवणाचं बिल तब्बल इतके लाख, एकूण खर्च किती?

 

Devendra Fadnavis | फडणवीसांचे आमदार आणि कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘नाराज होऊ नका, आपलंच सरकार’

 

Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’ – दीपक केसरकर