Sanjay Raut | संजय राऊत भाजपवर कडाडले, बेधडकपणे म्हणाले – ‘तुम्ही कितीही नामर्दांगी करून आमच्या…’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांवर भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप केले आहेत. त्याच आरोपांवरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन जाणीवपूर्वक त्रास देत आहे. काहीही खोटे आरोप करत आहे. लोकांमध्ये बदनामी करत आहेत. परंतु शिवसेना डगमगणार नाही, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र गांडूची औलाद नाही

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आजची पत्रकार परिषद घेण्याच एकच कारण आहे. महाराष्ट्र (Maharashtra) गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दांगी करुन आमच्या पाठीमागे वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रावर नाही तर देशावर संकट

मागील काही दिवसांपासून ठाकरे परिवार (Thackeray Family) आणि अनेक शिवसेनेचे दिग्गज नेते, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेते यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) ज्या पद्धतीने हल्ले करत आहेत. तर मला असं वाटतं तर हे महाराष्ट्रावरचं नाही तर देशावरचं संकट आहे. पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) तसंच आहे. महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचं आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव, एकतर तुम्ही सरेंडर व्हा नाहीतर गुडघे टेका अशा प्रकरारच्या धमक्या (Threats) दिल्या जात असल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत काय म्हणाले? त्यांच्याच शब्दात…

जय महाराष्ट्र! मला असं वाटतंय आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. पत्रकार बांधवांचं शिवसेना भवनात स्वागत. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना वंदन करतो, अभिवादन करतो आणि त्यांचं स्मरण करतो. कारण या वास्तूला इतिहास आहे. अनेक लढे या वास्तूतून केले आहेत. या वास्तूने अनेक हल्ले पचवले आहेत. अतिरेक्यांचा हल्ला (Terrorist Attack) देखील पचवला आहे. याच वास्तूच्या खाली अतिरेक्यांकडून बॉम्ब स्फोट (Bomb Blast) झाले आहेत.

संपूर्ण शिवसेना इकडे उपस्थित आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही इथून नमस्कार करतोय. ते वर्षा बंगल्याहून पत्रकार परिषद पाहत आहेत. त्यांचा आताच फोन होता. महाविकास आघाडीतील प्रत्येक प्रमुख नेत्याचा फोन आला. सगळ्यांनी आगे बढो सांगितलं. महाराष्ट्रावर मराठी माणसावर ज्या प्रकारे आक्रमण सुरु आहे त्या आक्रमणाविरुद्ध कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आपण या ऐतिहासिक वास्तूतून फुंकतोय. बाळासाहेब म्हणायचे, तू पाप केलं नसेल, मन साफ असेल तर कुणाच्या बापाला घाबरु नको. उद्धव ठाकरे याच पद्धतीने शिवसेना घेऊन जात आहेत.

आजची पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे. महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दांगी करुन आमच्या पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे परिवार आणि अनेक शिवसेनेचे दिग्गज नेते, महाविकास आघाडीतील अनेक नेते यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करत आहेत तर मला असं वाटतं तर हे महाराष्ट्रावरच नाही तर देशावरचं संकट आहे. पश्चिम बंगालमध्येही तसंच आहे. महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचं आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव. एकतर तुम्ही सरेंडर व्हा नाहीतर गुडघे टेका अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत.

भाजपचे काही लोक मला भेटले, म्हणाले…

20 दिवसांपूर्वी भाजपचे काही लोकं मला भेटले. त्यांना मी ओळखतो. त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. आम्हाला इथे सरकार पाडायचंय. आम्हाला इथे राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे. तुम्ही मध्ये पडू नका. मी त्यांना म्हटलं 170 आमदारांचं सरकार कसं पाडू शकता. तर ते म्हणाले, तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील. त्यानंतर तुम्हाला पश्चाताप होईल की तुम्ही आम्हाला का मदत केली नाही म्हणून. परंतु ठाकरे सरकारला (Thackeray Government) नख लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून घडणार नाही. त्यांनी पवार कुटुंबावर धाडी पडत असल्याचे बोलले. आम्ही त्यांना सुद्धा टाईट करु, असंही ते बोलले.

तर महाराष्ट्रात ठिगणी पाडू

विशेष म्हणजे त्यानंतर पवार कुटुंबाच्या (Pawar Family) घरावर धाडी पडल्या. तिथे सुद्धा याच धमक्या दिल्या.
आम्ही प्रतिकार करु, सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिगणी पाडू. तर ते म्हणाले,
आम्ही केंद्रीय पोलीस यंत्रणा आणून थंड करु. तिसऱ्या दिवशी माझ्यावर ईडीचा (ED) छापा पडला.
अत्यंत वाईट पद्धतीने पहाटे चार वाजता धाड पडली.
विशेष म्हणजे मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना अटक होईल असं सांगतो.

बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं…

बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला झुकू नका, असं सांगितलंय. मी त्यांना नाही म्हटलं म्हणून माझ्या आणि नातेवाईकांच्या घरी छापा टाकला.
त्यांनी जे आरोप केले आहेत ते खोटे आहे. माझी, मुले, नातेवाईक, मित्रपरिवार प्रत्येकाला बदनाम करायचं.
मुलांना फोन करुन ईडी घरी येते, वडिलांना अटक केली जाईल, असे सांगितले जाते.
अस निर्घृणपणे राजकारण भाजपकडून सुरु आहे.

महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे

खरंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घ्यायची होती. मात्र सुरुवात इथे करुन आणि अंत तिकडे करु. पाहू कोण राहतं ते.
हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. ही बाहेरची लोकं येऊन आमच्यावर दादागिरी करणार. आमच्या बायका-मुलींकडे बघणार, भाजपवाले टाळ्या वाजवणार हा निर्लज्जपणाचा कळस आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बाळासाहेबांच्या राज्यात असं काही घडलं नाही.

तर मी राजकारण सोडेन

जो दलला बोलतोय ना त्याला मराठीत भडवा म्हणतात. त्याने असं म्हटलं की ठाकरे कुटुंबाने थोरलाई गावात अलिबागजवळ (Alibag) 19 बंगले बांधून ठेवले आहेत. माझे आव्हान आहे त्या माणसाला, दलाला आव्हान आहे, कधीही सांगा, आपण चार बसेस करु आणि त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसेले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन.
आख्खी शिवसेना जोड्याने मारेन. कुठे आहेत 19 बंगले, चला पार्टी करु. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचे.

मराठी माणसांचा द्वेष करायचा. महाराष्ट्राविषयी असूया, हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षांपूर्वी हायकोर्टात अपील केलं होतं की, मुंबईतील शाळेत मराठी भाषेची सक्ती असू नये. हा भाजपचा फ्रंटमॅन ? आधी त्याचं थोबाडं बंद करा. पाटणकरांनी कर्जतला देवस्थानची जमिन विकत घेतल्या. मी स्वत: माहीती घेतली. माझं त्यांना आव्हान आहे, पाटणकरांची जमीन कुठे आणि कशी विकत घेतली ते दाखवा.
ही जमीन बाराव्या माणसाकडून खरेदी केली आहे.

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut press conference
against bjp gives answer to kirit somaiya allegations

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा