Homeताज्या बातम्याSanjay Raut | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Sanjay Raut | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नाराज आमदार हे पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Cabinet Minister Eknath Shinde) यांच्यासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना फुटणार नसल्याचा दावा केला आहे. शिवसेना ही निष्ठावान सैनिकांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या (Maharashtra) पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांची औलाद नाही. त्यामुळे शिवसेनेत दरी निर्माण होणार नाही. जे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पहात असाल, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

संजय राऊत म्हणाले, विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election Result) काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात बैठक आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

 

शिवसेना दुबळी करण्याचे कारस्थान

महाराष्ट्रामध्ये राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे (Madhya Pradesh Pattern) उद्धव ठाकरेंचे सरकार (Uddhav Thackeray Government) पाडावे अशा प्रकारची हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यांचे प्रयत्न सुरु आहेत पण महाराष्ट्रात चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mumbai BJP President Mangalprabhat Lodha) यांनी कालच्या निकालांवर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. यासाठी तुम्हीच फाटाफूट घडवून आणत आहात का ? मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना दुबळी करण्याचे कारस्थान असल्याचे संजय राऊत म्हणाले.

 

एकनाथ शिंदे जीवाभावाचे सहकारी

ज्या क्षणी त्यांच्याशी संपर्क होईल ते परत येतील. एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते.
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी ते प्रयत्न करत होते. एकनाथ शिंदे जीवाभावाचे सहकारी आहेत.
त्यामुळे त्यांच्यासोबत जोपर्यंत बोलणे होत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणतेही विधान करणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :-  Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut reaction about maharashtra minister eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News