Sanjay Raut | शिवसेना UPA मध्ये सहभागी होणार? राहुल गांधींच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. राहुल गांधी आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण राज्यातील आगामी महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर विधानसभा आणि 2024 मधील लोकसभा या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते.

 

शिवसेना युपीएत (UPA) सामील होणार का? भाजपविरोधात (BJP) देशभरात जी आघाडी निर्माण होईल त्या आघाडीत शिवसेना असणार का? त्या आघाडीत तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) असणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर या सर्व प्रश्नांवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंदर्भात माहिती दिली.

 

परवानगी दिली तर तुमच्याशी बोलेन
संजय राऊत म्हणाले, काही चर्चा या चार भिंतीत होतात, त्या फक्त वरिष्ठांशीच करायच्या असतात. त्यामुळे मी आज रात्री पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत बोलेन, त्यांनी परवानगी दिली तर तुमच्यासोबत बोलेन. राहुल गांधी यांच्यासोबत प्रदीर्घ काळ चर्चा झाली. राजकीय विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. काही वेळासाठी काँग्रेस नेते वेणुगोपाल (Venugopal) हे देखील सहभागी झाले होते, असे राऊत यांनी सांगितले.

राहुल गांधींना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा
विरोधकांचं ऐक्य, महाराष्ट्र सरकार, काही संघटनात्मक विषय, देशातील एकंदरीत परिस्थिती अशा अनेक विषयांवर चार्चा झाली. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधनीबाबत त्यांच्या मनात नेहमीच उत्सूकता असते. त्यासंदर्भात ते विचारत असतात. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) काल संसदेत भेटल्या होत्या. त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी आस्थेने चौकशी केली. या महिन्याच्या शेवटच्या काही काळात राहुल गांधी यांचा मुंबई दौरा ठरतोय. तेव्हा त्यांची मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रातील आघाडी एक प्रकारची यूपीएच
देशामध्ये विरोधी पक्षाचं एक मजबूत संघटन उभं राहावं आणि ते एकच संघटन आसावं असं आमचं मत आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचं देखील हेच मत आहे. वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करण्यापेक्षा एकच आघाडी आसावी, असं त्यांचे स्पष्ट मत आहे. आम्ही महाराष्ट्रात जरी काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सरकार चालवतो. तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही एक प्रकारची यूपीएच आहे. या देशात एनडीए (NDA) आणि युपीए दोन वेगवेगळ्या प्रकारचे कामे करतात, असे संजय राऊत म्हणाले.

सध्या आघाडी तयार होणं गरजेचं
भाजपविरोधात तयार करण्यात येणाऱ्या आघाडीचं कोण नेतृत्व करावं यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही.
यासाठी अनेक ज्येष्ठ लोक काम करत आहेत. शरद पवार अनेक वर्षांपासून काम करत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आपली भूमिका सांगितलेली आहे. तसेच नेता नंतरचा विषय आहे सध्या आघाडी तयार होणं जरुरीचं आहे,
असे शरद पवार यांचं मत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली.
युपीए विषयी पुढच्या 24 तासात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सांगेन असे राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut reaction after rahul gandhi meet in delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता आणि बांधकाम व्यावसायिक समीर उर्फ लालबादशाह खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | ‘या’ योजनेतून सुमारे 40 लाख लोकांना मिळाली नोकरी! मोदी सरकारनं संसदेत सांगितलं

New Feature in Gmail | Gmail मध्ये आले ‘हे’ शानदार फीचर, आता यूजर्स चॅटसोबत करू शकतात Audio आणि Video कॉल