Sanjay Raut | ‘…म्हणून मी नारायण राणेंना मानतो’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, मी नारायण राणेंना मानतो… असे वक्तव्य केले आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. याबाबत त्यांनी सांगितलेला किस्सा तेवढाच महत्वाचा आहे. (Sanjay Raut)

 

बंडखोर शिंदे गटाला सुनावताना संजय राऊत म्हणाले की, जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना (Narayan Rane) मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांचे 22 लोक फुटले. त्यांनी राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवले. (Sanjay Raut)

 

तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्या. कितीही असू द्या. 54 असू द्या. राजीनामे द्या आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझे खुले आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवू नका, असे खुले आव्हान राऊत यांनी दिले.

 

सामानातून बंडावर फटकारे

संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातूनही शिंदे गटाची राजकीय कारकीर्द संपल्याचे म्हटले आहे.
त्यांनी लिहिले आहे की, नारायण राणे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्यासोबतही दहाच्या वर आमदार नव्हते.
राणे यांचे कोकणात त्यावेळी महत्त्वाचे स्थान होते.

राणे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात पोट निवडणुका झाल्या.
त्यात काही लोक जिंकले, पण नंतरच्या मध्यवधी निवडणुकीत राणे यांच्यासह बहुतेक सर्वच आमदार कोकणात पराभूत झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात आली.

संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आमदार इकडे येऊन उघडपणे बोलत नाहीत तर आम्ही ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत,
त्याच हॉटेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
पण आम्हाला येऊ दिले जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते 18 मजल्याचे हॉटेल आहे. तेथे 300 खोल्या आहेत.
त्यापैकी काही खोल्या आम्ही बुक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, पण आमच्या ईमेलला कुणीही उत्तरच देत नाही.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut reaction on bjp leader and union minister narayan rane maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा