Sanjay Raut | ‘बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळालं आहे. काही छोट्या मुद्यावरुनही दोघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यामुळे राज्यातील राजकारण सातत्याने तापलेलं पाहायला मिळत आहे. नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. त्यावर दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला होता. यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, जे लोक दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या बाता करताहेत त्यांना एक सांगतो आम्ही जर बॉम्ब फोडले तर या लोकांना घरात काय बाथरुममध्ये तोंड लपवून बसावं लागेल, अशा शब्दात थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्यावेळी ते म्हणाले, बॉम्ब फोडण्याची भाषा करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आम्ही जर बॉम्ब फोडले तर घरात काय बाथरुममध्ये तोंड लपवावं लागेल असे गौप्यस्फोट करु. पण आम्ही तसं करणार नाही. कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. राजकाराणालाही काही मर्यादा असतात आणि त्या ओलांडायच्या नसतात. महाराष्ट्राची अशी घाणेरडं राजकारण करण्याची संस्कृती नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे राऊत म्हणाले, जेव्हा यांच्यावर आरोप होतात तेव्हा यांचं कुटुंब ते कुटुंब आणि मग आमचं कुटुंब, मुलं, बायका काय रस्त्यावर पडल्यात का?
त्यामुळे यांनी आम्हाला राजकारणाची संस्कृती शिकवू नये”, असं देखील ते म्हणाले.
त्याचबरोबर मला आज कळालं की अजित पवारांच्याही (Ajit Pawar) मालमत्तांवर आयकर विभागाचे (Income Tax Department) छापे पडले आहेत.
पण मला एक कळत नाही. भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का?
त्यांनी काय सगळे टॅक्स भरलेत का? ईडी, इन्कम टॅक्स वाल्यांना फक्त महाविकास आघाडीचेच नेते कसे काय दिसतायत यामागचं खरं कारण सर्वांना माहित आहे.
त्यामुळे मला बोलायला लावू नका.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena Leader and MP sanjay raut slams bjp leaders gives warning about blow allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Organ Donation | 14 वर्षाच्या ब्रेन डेड मुलानं पुण्यातील व्यक्तीसह 6 गरजूंना दिलं ‘जीवदान’ ! हृदय, फुफ्फुस, डोळे, लीव्हर आणि दोन्ही हात आई-वडिलांनी केले ‘दान’

Deglur Assembly bypolls result | भाजपाला धक्का ! देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांची दिवाळी ED च्या कोठडीत, न्यायालयाने सुनावली ‘एवढ्या’ दिवसांची कोठडी