Sanjay Raut | संजय राऊतांचं मोदी सरकारला ओपन चँलेज; म्हणाले – ‘तुम्ही हवं तर आम्हा सर्वांना निलंबित करा, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | मागील महिन्यापासून दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. त्याबरोबरच विरोधी पक्षांच्या 12 निलंबित खासदारांमुळे संसदेबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे. तसेच, लखीमपूर खेरीच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी आता आपला विरोध तीव्र करायला सुरूवात केला आहे. या सर्व मुद्यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारला (Modi government) ओपन चँलेज दिलं आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

 

काय म्हणाले संजय राऊत?
आज (मंगळवारी) दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘संसदेचं सत्र संपू शकतं. हे सरकारच्या मर्जीने होईल. पण मला वाटतं लखीमपूर खेरीचा लढा संपणार नाही. पूर्ण जगानं पाहिलंय की कशा प्रकारे मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलं. पण आमच्या गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी ते पाहिलं नाही. ही एसआयटी (SIT) तर तुम्हीच तयार केली. त्यांचा अहवाल आला. पण तरीही तुम्ही ऐकायला तयार नाहीत.

 

पुढे ते म्हणाले, ‘विरोधकांची ही एकजूट वारंवार सरकारला प्रश्न विचारत राहील. मग तुम्ही आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा. आज 12 खासदारांना निलंबित केलंय, पुढच्या सत्रात 50 करा, आम्हा सर्वांना निलंबित करा. पण आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणं बंद करणार नाही. तुमच्या मंत्रिमंडळात जे खुनी बसले आहेत, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

दरम्यान, ‘देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आम्हालाच प्रश्न विचारतात की महाराष्ट्रात काय चाललंय.
पण तुमच्याच राज्यात तुमच्या नाकाखाली काय घडतंय, हत्या होतेय त्यावर तुम्हाला प्रश्न विचारणं योग्य वाटत नाही.
तुम्ही कारवाई करत नाही. असं ते म्हणाले. तर, मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचे आभार मानतो की, तुम्ही हा मुद्दा उठवला नसता,
त्या दिवशी रात्री तिथे पोहोचले नसते, तर त्याच दिवशी रात्री हे पूर्ण हत्येचं प्रकरण गुंडाळलं असतं.
त्यामुळे मी सर्व विरोधकांच्या कडून तुमचे आभार मानतो,’ असं देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay raut slams modi government on opposition mp suspension lakhimpur kheri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील बिल्डरला 50 % व्याजदारे पैसे देणार्‍या बाबा बोडके टोळीतील निलेश जोशीला गुन्हे शाखेकडून अटक; 25 चे मागत होता 50 लाख, कोथरूडमधील 1200 स्क्वेअर फुटच्या फ्लॅटचा ताबा घेण्याची धमकी

Beed Crime | दुर्देवी ! जेवण करून घराबाहेर फिरत असताना भरधाव जीपने 2 सख्ख्या बहिणींना चिरडलं

Rupali Chakankar | महिलांना शौचालय वापरासाठी 7 रूपये; युवकाची ट्विटद्वारे तक्रार; रुपाली चाकणकरांनी घेतली तात्काळ दखल