Sanjay Raut | संजय राऊत आव्हान देऊन फसले ! ‘हनुमान चालिसा’च्या नावावर म्हणाले ‘मारूती स्त्रोत अन्…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उत्तरसभेत बोलताना 3 मे पर्यंत भोंगे हटवा नाहीतर हनुमान चालिसा लावू असा इशारा सरकारला दिला. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यानंतर आता शिवसेनेने मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले आहे त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हनुमान चालीसा पाठ नाही,’ असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे (MNS) आणि भाजपला (BJP) हनुमान चालीसा कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं आव्हान दिले.

 

”हनुमानाचे खरे भक्त असाल तर हनुमान चालिसा पाठ असायला पाहिजे. हनुमान चालिसातील पहिल्या दोन ओळीही पाठ नाहीत. राष्ट्रगीत म्हणता येत नाही त्यांना हनुमान चालीसा कुठून येणार असं सांगितले ? मात्र त्यावेळी कॅमेऱ्यासमोर हनुमान चालिसा पाठ असल्याचं,” सांगत संजय राऊत यांनी थेट मारूती स्त्रोत म्हणून दाखवलं. “भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती, वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना, महाबळी, प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी दु:खहारी दूत वैष्णव गायका” असं म्हणत संजय राऊतांनी हनुमान चालीसा आमची पाठ आहे. तुम्ही यातील दोन वाक्य म्हणा, आम्ही ढोंग करत नाही,’ असं राऊत म्हणाले.

दरम्यान, माध्यमांनी आपण जे म्हणून दाखवलं ते मारूती स्त्रोत आहे असं सांगितले. त्यावेळी राऊत म्हणाले, ”स्त्रोत असेल किंवा चालिसा असेल आम्ही हनुमान भक्त आहोत. मी रोज स्त्रोत वाचतो. चालीसा पठणही करतो. तेही वाचून दाखवेन. पण मी जे म्हणतोय ते कथाकथित हनुमान भक्तांनी वाचून दाखवावं असं म्हणत वेळ मारून नेली. तसेच भोंगे, हनुमान चालिसा याबाबत घाणेरडे राजकारण करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, कोल्हापूरच्या जनतेने भोंगे खाली उतरवले आहेत,” असं म्हणत राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला.

 

दरम्यान, पुढे संजय राऊत म्हणाले, ”महाराष्ट्रात भाजपा निराशा आणि वैफाल्याने ग्रस्त आहेत.
सत्ता येत नाही आमदार फुटत नाही. अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करूनही लोकं शांतता भंग होऊ देत नाहीत.
भोंगे यांनी लावायचे आणि नवहिंदु औवेसी आणि खरा औवेसी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली भडकवायचा.
त्यानंतर राजभवनातून केंद्राला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं हे षडयंत्र आहे,”
असा गंभीर आरोप राऊतांनी राज ठाकरेंचं नाव न घेता केला.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut spoke wrongly hanuman chalisa at the press conference

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा