Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले – “यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना कायमचं…”

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई केल्यानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या कारवाई वरून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे म्हणत टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील भाजपवर (BJP) खरमरीत टीका केली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) सध्या नागपूर (Nagpur News) दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘शिवसंवाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे राऊत म्हणाले की, “काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर दुपारी ईडीनं कारवाई सुरू केली आणि लोकांचं लक्ष तिकडे वळवायला सुरुवात केली. मालमत्ता जप्त करण्याआधी त्यांना बोलवायला हवं होतं. या कारवाईचं भाजपाकडून समर्थन केलं जात आहे. ही हुकुमशाहीची नांदी आहे.”

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “यांच्या कारवायांमुळे सरकार अस्थिर होत नाही. उलट ज्या काही फटी होत्या, त्या बुजल्या गेल्या. यामुळे 3 पक्ष इतके एकत्र आले, की आता हे तुटणं शक्य नाही”, असं देखील ते म्हणाले.

किरीट सोमय्यांवर हल्लाबोल..

“किरीट सोमय्या यांच्या (Kirit Somaiya) बोलण्याला कोण विचारतंय ? ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हवाला किंगचे भाजपाच्या लोकांशी संबंध असल्याचे पुरावे मी पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. पण त्यावर ईडी कारवाई करत नाहीये. सोमय्यांना आजपर्यंत अनेकदा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या घोटाळ्यांची माहिती दिली. पण त्यांच्या तोंडातून शब्द निघालेला नाही. त्यांनी ज्या नेत्यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईची मागणी केली, ते सगळे लोक नंतर भाजपात गेले. त्यानंतर या महाशयांची वाचा गेली. मग यांच्यावर काय विश्वास ठेवताय ? सोडून द्या”.

पुढे राऊत म्हणाले, “एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल. यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत.
जे करतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की यांची लाकडं रचली गेली आहेत.
त्यांना राजकारणातून कायमचं हे राम म्हणावं लागेल,” अशा शब्दात संजय राऊत यांनी घणाघात केला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader and MP sanjay raut targets bjp kirit somaiyya on ed raid shridhar patankar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा