Sanjay Raut | नवनीत राणांच्या आरोपांना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे ट्विट करुन प्रत्युत्तर; शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) गंभीर आरोप केला आहे. मागासवर्गीय असल्याने भेदभावपूर्ण आणि मानवी हक्क नाकरले जात आहेत, असा आरोप राणा यांनी केला आहे. त्यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी पोलीस ठाण्यातील एक सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) ट्विट करुन राणा यांच्या आरोपांना उत्तर दिले. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुडाच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिले असून देशाने आभार मानावेत, असे सांजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

 

संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरु आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावलेत. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी (Opposition) मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुडाच्या आरोपांना पुराव्यासह उत्तर दिले असून देशाने त्यांचे आभार मानले पाहिजेत. राणा यांच्याशी मुंबई पोलीस सौजन्याने वागल्याचे दिसून आल्याचे राऊत म्हणाले.

 

 

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केलेल्या ट्विटनंतर जातीच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप खोटा असल्याचे समोर आले आहे. राणा यांचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate) खोटं असून त्यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. दरम्यान, आपण कोणालाही जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली नसल्याचे राऊत यांनी सांगितले. राणा दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

किरीट सोमय्यांना टोला

किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असा टोला लगावला आहे. तसेच जे अस्वस्थ नेते आहेत, अशांत नेते आहेत,
त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण करावं, त्यांच्या मनाला शांती मिळेल असा खोचक टोला त्यांनी लगावला.

 

आमच्या हातातील हिंदुत्वाची गदा…

आमच्या हातातील हिंदुत्त्वाची गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे,
त्यांच्या डोक्यावर जाऊन आपटेल, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्णाण करत असल्याची टीका त्यांनी केली.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay says india must be thanks to mumbai police commissioner for exposing navneet rana fake allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा