Sanjay Raut | ‘2024 पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sanjay Raut | आज (शुक्रवारी) शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यातही राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान याआधी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ‘2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल’ आणि आमचे 22 खासदार निवडून येतील, असं मत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत (Sanjay Raut) बोलताना म्हणाले की, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 48 जागांपैकी 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता.
आता संपूर्ण देशाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) केंद्रस्थानी असेल.
शिवसेना कोणती भूमिका घेणार हे पूर्ण देश समजून घेऊ इच्छत आहे. शिवसेना राष्ट्रीय राजकारणात आहेच.
आता आमचे 22 खासदार होतील, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि देशात अनेक घटना घडल्या आहेत. यावेळी शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ शकत नाही.
पण सर्व नियमाचे पालन करून मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे काम होईल.
तर, अमली पदार्थांची तस्करी आणि उलाढाल यांच्यातून येणारा पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येतो.
असे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणतात.
देशात प्रखर राष्ट्रवादी सरकार आहे. तरीही देशात असे होत असेल तर ते चुकीचे आहे.
सरसंघचालक कोणाला जबाबदार धरणार आहेत. त्यांच्या बोलण्याला एक महत्त्व असते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government) आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते, तशी अवस्था भाजपची (BJP) झाली आहे.
सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते.
पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरूच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दसऱ्याचे सोने लुटायला महाराष्ट्र सज्ज झालाय. अशी फटकेबाजीही शिवसेनेनं सामनातून केली आहे.

 

Web Title : Sanjay Raut | shivsena leader mp sanjay raut claims till 2024 shiv sena will center national politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शस्त्र कधी आणि कोणासाठी काढायची…’; संजय राऊतांचा सूचक इशारा

Akola Crime | स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ! पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग; अकोल्यात प्रचंड खळबळ

Multibagger Stock | 20 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार बनले लखपती, एका वर्षात 1 लाख झाले 31 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?