Sanjay Raut | ‘गुजरातमध्ये 21 हजार कोटींच हेरॉईन सापडलं, मग आता तोंडात बोळा कोंबून का बसलेत?’ – संजय राऊत

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut |अभिनेत्री रिया चक्रवतीच्या (rhea chakraborty) प्रकरणात मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये २ ग्रॅम हेरॉइन सापडलं होतं तेव्हा भाजपसह (BJP) सर्वांनी भंडावून सोडलं होत. मात्र आता गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा बंदरावर तीन हजार किलोग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले आहे. याची किंमत जवळपास २१ हजार कोटी रुपये आहे.तरी तोंडात बोळा कोंबून का बसलेत? राज्यातील भाजपचे नेते यावर का बोलत नाहीत?२ ग्रॅम हेरॉईनसाठी नंगा नाच आणि आता ९ हजार कोटींचे हेरॉइन सापडलं तर गप्प का बसलेत, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, गुजरातमध्ये (Gujrat) सापडलेले हेरॉईन कुठे जात होते? याचा तपास व्हायला पाहिजे. या हेरॉईनचे थेट कनेक्शन अफगाणिस्तानात आहे.
तालिबानसोबत संबंध आहेत तेव्हाच इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉईन सापडल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय या हेरॉईनच्या माध्यमातून कोण पैसे कमावत होते हे तपासणे देखील महत्वाचे असल्याचे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, चेन्नईमधून एका दाम्पत्याला गुजरात हेरॉईनप्रकरणी अटक केल्यानंतर हे हेरॉईन अफगाणिस्तानातून आणल्याचे समोर आले. त्यानंतर ‘डीआरआय’ने कारवाईचा बडगा उगारला होता. हे अमली पदार्थ आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे नोंदणी असलेल्या एका कंपनीने मागविले होते. इराणच्या अब्बास बंदरातून हे आल्याचे स्पष्ट होताच अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी या भागांत छापे टाकण्यात आले याशिवाय दोघांना अटकही केली आहे.

हे देखील वाचा

Pravin Darekar | ‘त्या’ वक्तव्यावरुन प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

Mumbai High Court | वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Sanjay Raut | shivsena leader mp sanjay raut criticized bjp on gujrat heroine case said…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update