Sanjay Raut | काश्मीर फाईल्सवाल्यांनी आता ‘भाग सोमय्या भाग’ हा चित्रपट काढावा – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने (Court) फेटाळला आहे. तर सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

 

आता भाग सोमय्या भाग, हा नवीन चित्रपट काश्मीर फाईल्सवाल्यांनी (The Kashmir Files) काढायला हवा. जर तुम्ही गुन्हा केला नाही, आम्ही घाबरत नाही म्हणता. तुम्ही इतरांना त्यांच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारता. कोर्टाला आणि कायद्याला सामोरे जा म्हणता, मग तुम्हीच का पळता ?, असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.

 

आयएनएस विक्रांत संदर्भात जो घोटाळा झालेला आहे, असा प्रकार देशात कधी झाला नव्हता. तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळला आहात.
ज्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या मदतीने आपण पाकिस्तानला हरू शकलो.
अशा युद्धनौकेचे जतन करावी अशी सर्वांची भावना होती, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, आम्ही याविरोधात आता हायकोर्टात धाव घेणार आहे.
आत्ताच या प्रकरणात काही सांगता येणार नसल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता उद्या नील सोमय्यांबाबत काय निर्णय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader sanjay raut kashmir filers should now make a movie bhaag somaiya bhaag

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा