पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि भाजपच्या काही नेत्यांनी आणि मंत्र्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध नोंदविण्यासाठी आज (दि. 13) पुणे बंद पाळण्यात येत आहे. विविध संघटना, राजकीय पक्ष, विविध संघ आणि गणेशोत्सव मंडळे या बंदमध्ये सहभागी आहेत. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. आज पुणे बंद आहे. त्याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागेल. आज पुणे बंद आहे, हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर देखील राऊतांनी आक्षेप घेतला आहे. राऊत म्हणाले, पहाटेचा गाजलेला शपथविधी झाला, तेव्हा राज्यपाल आणि गृहमंत्र्यांचा संपर्क सर्वात जास्त होता. राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले, तरी ते गृहमंत्रालयाच्या अधीन येतात. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्त्यांवर गृह मंत्रालय काम पाहत असते. त्यांचे राजकीय बॉस हे गृहमंत्री असतात. त्यामुळे त्यांनी घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींऐवजी आपल्या राजकीय बॉसला पत्र लिहिले आहे. त्यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे आज पुणे बंद आहे. उद्या हळूहळू महाराष्ट्र बंद होण्यास वेळ लागणार नाही. (Sanjay Raut)
पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
पुणे आणि रायगडावर त्यांच्या कारभाराची सर्व सूत्रे हलली होती.
आजच्या पुण्यातील कडकडीत बंदची दखल केंद्र सरकारने घेतली पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने आणि राज्यपाल कोश्यांरींनी देखील ही दखल घेतली पाहिजे.
राज्यपालांच्या पत्राचा असर महाराष्ट्रावर झाला नाही, हे पुणेकरांनी दाखवून दिले आहे.
बंदचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेले, तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र देखील बंद होईल,
असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
Web Title :-Sanjay Raut | shivsena mp sanjay raut criticize cm eknath shinde dcm devendra fadnavis over border issue
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Janhvi Kapoor Fitness | समोर आले जान्हवी कपूरच्या फिटनेसचे रहस्य, कशी बनली Chubby ते Curvy Baby?