Sanjay Raut | राज्यपालांची चहा बिस्केटे न खाता त्यांना शिवरायांच्या अपमानावर भाजप नेते प्रश्न विचारणार का? – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 19 डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी राज्यपालांना नारळ दिला गेला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 19 तारखेला आहे. त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावी लागेल. आशिष शेलार म्हणतात, ‘अरे ला कारे’ म्हणून उत्तर देऊ. मात्र, आधी शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवात जाऊन त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्किटे न खाता, त्यांना विचारा ‘कारे’. आधी ‘कारे’ तिथे विचारा, मग बाकीच्या गोष्टी करा, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला धारेवर धरले. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, काल भाजपने नवा शोध लावला. म्हणे, शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. त्यांनी शिवनेरीवर फुली मारली आहे. इतिहासातून शिवनेरी काढून टाकले आहे. मुळात त्यांना शिवाजी महाराज तरी मान्य आहेत का? असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

चंद्राकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांचा कर्नाटक दौरा लांबणीवर जात आहे.
त्यामुळे त्यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले, देसाई आणि पाटलांनी कर्नाटक सीमारेषेला निदान स्पर्श तरी
करून यावे, बाकी इकडे काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण यांच्यात ती हिंमत नाही. हे हतबल आणि लाचार लोक आहेत. ते काहीही करू शकत नाहीत. आम्हाला शिव्या घालतात, हिंमत असेल तर बोम्मईंना शिव्या घालून दाखवा. शिवरायांचा इतिहास तोडणाऱ्यांना शिव्या घालून दाखवा. शिवरायांचा अपमान असेल किंवा कर्नाटक सीमाप्रश्न असेल, हे सरकार भूमिका घेऊ शकत नाही.

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut criticized bjp over statement on shivaji maharaj by bhagat singh koshyari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Pune Pimpri Crime | दुधिवरे खिंडीत सहलीतील विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली; 3 जण गंभीर जखमी