Sanjay Raut | ‘आता भाजपने नौटंकी बंद करावी’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sanjay Raut | राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) केलेल्या गंभीर आरोपावरुन आणि राज्यव्यापी एसटी कामगारांनी (ST workers) पुकारलेल्या आंदोलनावरुन भाजप चांगलांच आक्रमक झाला आहे. भाजपने एसटी कामगारांच्या संपाना पांठीबा दर्शविला आहे. यातच शिवसेनेचे नेते (Shiv Sena) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की. सर्व प्रकरणांमध्‍ये राज्यपालांनी लक्ष घालायला हवं.
भाजपने नौटंकी बंद करावी, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. ‘शिवसेना कष्टकऱ्यांचं नेतृत्व करते.
महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत आहे.
ज्यांनी आरोपांची परंपरा सुरू केली, त्यांची आता पळता भुई होत आहे.
आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण कुठेतरी थांबवा. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालायला हवं.
भाजपने नौटंकी बंद करावी. असं राऊत म्हणाले आहेत.

 

दरम्यान, पुढे संजय राऊत म्हणाले, नवाब मलिकांचे आरोप हे संतापातून होत आहेत.
महाराष्ट्र कधीही कष्टकरी नागरिकांसोबत गद्दारी करणार नाही.
कोरोना काळात एसटीचा प्रचंड तोटा वाढला त्यातून हे संकट उद्भवलं आहे.
भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहनही संजय राऊत यांनी एसटी कामगारांना केले आहे.

 

Web Title : sanjay raut | shivsena mp sanjay raut criticizes bjp upon st workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर घणाघाती आरोप, म्हणाले… (व्हिडीओ)

Maharashtra Rains | विकेंडला राज्यात मुसळधार ! पुण्यासह 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

PF Account | तुमच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे कोणत्या हिशेबाने आले; जाणून घ्या