Sanjay Raut | राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या चर्चेनंतर श्रेयासाठी शिवसेना सरसावली; संजय राऊत म्हणाले – ‘शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच…’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – गेले अनेक दिवस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी भाजप आणि राज्य सरकारला धारेवर धरत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही म्हटले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

 

“राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!” असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

 

दरम्यान, राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘हे केंद्रच पार्सल माघारी घेऊन जा अन्यथा महाराष्ट्र बंद करू,’ अशी भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या या चेतावणीनंतर राज्यपालांना त्यांच्या पदावरून काढण्यात येत असल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपाल यांचा काय तो निकाल राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी लावावा, अशी मागणी केली होती.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on governor bhagatsingh koshyari relieve for post governor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Ajit Pawar – Raj Thackeray | आम्ही दोघे ‘ओठात एक आणि पोटात एक’ असे बोलत नाही; अजित पवार राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल