Sanjay Raut | ‘एक पुतीन दिल्लीत बसलेत जे…’; संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची पुतीन यांच्याशी तुलना करत केली जहरी टीका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचं धाडसत्र सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्रातील सरकार यांच्यामध्ये खडाजंगी सुरु आहे. या धाडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (President Vladimir Putin) यांच्याशी केली आहे.

 

आपल्या देशात युद्ध (War) नाही पण आमच्यासारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत. एक पुतीन दिल्लीमध्ये (Dehli) बसलेले आहेत. ईडी (ED), सीबीआय (CBI), आयटी (IT) या माध्यमातून बॉम्ब सोडले जात आहेत. रोज एक मिसाईल (Missile) येत आहे त्यातून आम्ही वाचलो असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

ज्या राज्यांमध्ये आपलं सरकार नाही त्या राज्याशी अधिक सन्मानाने वागलं पाहिजे हे आम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी शिकवलं. आपल्या विरोधात सूर लावणारे जे की आपल्या विचाराचे नाहीत त्यांना सन्मान (Respect) देणं ही खरी लोकशाही (Democracy) असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) नागपुरमधील एका कार्यक्रमात राऊत बोलत होते.

 

दरम्यान, संजय राऊत यांनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधला.
पुन्हा येईल वाले संध्याकाळी इथे येणार आहेत तेव्हा मीही येईल आणि बाजुला बसेल, असं राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on pm narendra modi russian president vladimir putin

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा