Sanjay Raut | ‘माझ्यावरील आरोप निराधार आणि खोटे’; ‘त्या’ प्रकरणावरील सुनावणी दरम्यान संजय राऊतांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay Raut) यांना 1 ऑगस्टला अटक (Arrest) केली होती. सध्या संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असून आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) त्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somayya) यांनी राऊतांविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी न्यायालयात झाली. यासाठी राऊत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते मेधा सोमय्या यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले.

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांची वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक आहेत, अशी टिप्पणी करत शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (Shivdi Metropolitan Magistrate Court) राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु, संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडींतर्गत आर्थर रोड जेलमध्ये असल्याचे मेधा सोमय्या यांचे वकील सनी जैन (Lawyer Sunny Jain) यांनी सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी राऊत यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे निर्देश दिले.

 

तुरुंग प्रशासनाने राऊत यांना न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी तुम्हाला आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा न्यायाधीशांनी त्यांना केली.
तेव्हा, मला माझ्या वकिलांशी चर्चा करण्याची संधी मिळाली नाही, असे सांगत आरोप अमान्य असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
तसेच मी दोषी नाही. माझ्यावरील आरोप निराधार व खोटे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

 

मेधा सोमय्यांची तक्रार

मीरा-भाईंदर महापालिका (Mira-Bhayander Municipality) क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभालीच्या प्रकल्पात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात सोमय्या कुटुंबीयांच्या युवा प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे,
असा आरोप करुन संजय राऊत यांनी माझी मानहानी केली,
असा दावा मेधा सोमय्या यांनी करत राऊत यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

 

Web Title : –  Sanjay Raut | shivsena mp sanjay raut refuse allegations in medha somaiya defamation case in sewri court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा