Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Borderism) काही केल्या शांत होत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) या प्रकरणी आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे सीमाप्रश्न चिघळत चालला आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राम मंदिराचा प्रश्न जर सुटू शकत असेल, तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न का नाही सुटणार, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

महाराष्ट्र कर्नाटकचा सीमाभाग हा मराठी अल्पसंख्यांक आहे. येथे मराठी भाषिकांवर अत्याचार केला जातो. न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे म्हणून, केंद्राने यात हस्तक्षेप करायचा नाही का? न्यायालयात राम मंदिराचा (Ram Mandir) मुद्दा देखील प्रलंबित होता. पण त्यावर सतत सुनावणी घेऊन केंद्राने हा प्रश्न निकाली काढला होता. मग तशीच भूमिका महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर का नाही, असा प्रश्न राऊतांनी (Sanjay Raut) उपस्थित केला. राम मंदिराचा प्रश्न राजकीय होता. पण 20 ते 25 लाख मराठी माणसांचा प्रश्न आहे, त्यावर तारखा पडत आहेत.

बेळगाव प्रश्न अनेक वर्षे सोडवला जात नाही. तो सातत्याने राजकारणासाठी पेटत कसा राहिल, हे पाहिले जात आहे.
हा संपूर्ण भाग केंद्र शासित करण्याचा अधिकार केंद्रीय गृहमंत्र्याचा आहे.
त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यात मध्यस्थी करावी. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे.
तरी देखील वाद सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, कोणालाही भेटून काही फायदा नाही.
मात्र, आम्ही म्हणतो गृहमंत्र्यांना भेटून फायदा आहे. हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना आहे,
असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Web Title :-Sanjay Raut | shivsena mp sanjay raut say if the ram temple issue can be resolved why not the maharashtra karnataka border dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Income Tax भरणाऱ्यांना दिलासा, नोकरदारांना होणार फायदा! टॅक्‍स सवलत संबंधी नवीन आदेश जारी

Pune Crime | पिण्यासाठी पाणी न दिल्याने सलून मालकावर कोयत्याने वार, आंबेगाव खुर्द येथील घटना