Sanjay Raut | गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात; ‘मग त्या राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी बोलताना संजय राऊत यांना शिवीगाळ केली होती. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. शिंदे गटाच्या आमदारांना फार शिव्या येतात. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांना त्या शिव्या द्याव्यात, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

 

मला कुणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना आई-बहिणीवरून उत्तम शिव्या देता येत असतील, तर त्यांनी त्या महाराष्ट्राचे राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना द्याव्यात, आम्ही शिव्या देणाऱ्यांवर फुले उधळू, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. मला शिव्या देणाऱ्यांचे मी स्वागत करतो. त्यांना उत्तम शिव्या येतात. त्यांनी त्या राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांना द्याव्यात. आम्ही त्यांचे कौतुक करू. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करत आहात, सावित्रीबाई फुलेंचा अपमान सहन करत आहात, शिवप्रेम तर ढोंगच आहे, त्याची लाटच आली आहे, मग त्यावर शिंदे गटाचे लोक शिव्या का देत नाहीत? पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होते, महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्याबद्दल अस्मिता थंड पडते, असे राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आपला देश एक संघराज्य आहे. अनेक राज्यांचा मिळून देश तयार झाला आहे. सर्व राज्यांचे एकमेकाशी प्रमाचे संबंध आहेत.
अगदी कर्नाटकशीसुद्धा आमचे प्रेमाचे संबंध आहेत. अनेक राज्यांची मुंबईत भवने आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेले होते.
तेथून आल्यावर त्यांनी मुंबईत आसाम भवन उभारण्याची घोषणा केली.
त्यामुळे महाराष्ट्र भवनदेखील आसामला उभे करावे. त्यामुळे एकोपा आणि प्रेम वाढेल.
कर्नाटक सोलापूर, कोल्हापूरमध्ये संस्था उभारत आहेत. आमचा कानडी भावांशी काही वाद नाही.
तुम्हीच इर्षेने तो वाद काढत आहात. तुम्ही कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये संस्था उभारणार असाल,
तर आम्हाला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी बंगळुरू आणि बेळगावमध्ये जागा द्या, असे यावेळी राऊत म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut slams rebel mla over bhagat singh koshyari statement maharashtra political news nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मुलाच्या त्रासामुळे 17 वर्षाच्या युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, चंदननगरमधील घटना

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Chennai Super Kings (CSK) | धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण? सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ मोठा खुलासा