Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शस्त्र कधी आणि कोणासाठी काढायची…’; संजय राऊतांचा सूचक इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दसऱ्यानिमित्त शिवसेनेचा दसरा मेळावा (shivsena dasara melava) आज पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं (CM Uddhav Thackeray) भाषण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 6 महिन्यांवर आलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात फोडला जाणार आहे. दरम्यान, संध्याकाळी जेव्हा उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहतील तेव्हा विजयादशमीनिमित्त जी शस्त्रं काढली जातात ती कोणासाठी कशासाठी काढली जातात हे कळेल, असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. मधल्या काळात देशात, राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिवतीर्थावर मेळावा होऊ शकत नाही, त्यामुळे षणमुखानंद हॉलमध्ये (Shanmukhanand Hall) नियमांचं पालन करुन आजचा मेळावा होईल, त्यातून महाराष्ट्राला, देशाला, राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल, असं राऊत म्हणाले.

भविष्यात शिवसेना राजकारणाच्या केंद्रस्थानी

राऊत पुढे म्हणाले की, आज विजयादशमी असल्यामुळे शुभ बोललं पाहिजे. शिवसेना 2024 ला राष्ट्रीय राजकारणात (national politics) केंद्रस्थानी असेल, 2024 ला सगळं काही स्पष्ट होईल. देशात शिवसेनेचे 22 खासदार येत्या काही दिवसांत पहायला मिळतील. दादरा नगर हवेलीचा (Dadra Nagar Haveli) खासदारही शिवसेनेचा असेल, असा दावा राऊत यांनी यावेळी केला.

 

Web Title : Sanjay Raut | shivsena mp sanjay raut statement over shivsena dasara melawa today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Akola Crime | स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ! पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग; अकोल्यात प्रचंड खळबळ

Multibagger Stock | 20 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदार बनले लखपती, एका वर्षात 1 लाख झाले 31 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का?

Gulabrao Patil | ‘लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली’