Sanjay Raut | एकनाथ शिंदेंच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपमध्ये युती होणार? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका समजून घेण्यासाठी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Secretary Milind Narveka) आणि रवींद्र फाटक (Ravindra Phatak) मुंबईतून सूरतला गेले होते. याठिकाणी अर्धा तास चर्चा केल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी काही अटी ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र, शिवसेना (Shivsena) हा पक्ष अटी शर्थींवर चालत नाही, असं वक्तव्य करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. तसेच शिंदेंनी यांनी भाजप (BJP) सोबत युती करण्याच्या प्रस्तावर देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचे विधान केले.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात फोनवर जी चर्चा झाली त्याबद्दल काही बाबी समजल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी त्यांची भूमिका आहे हे आज सकाळपासूनच समजलं आहे. आणि शिवसेना हा पक्ष अटीशर्तींवर चालत नाही. एका विशिष्ट परिस्थितीत शिवसेनेला भाजपपासून दूर व्हावं लागलं. 25 वर्षांची युती ज्या परिस्थितीत तोडावी लागली त्याची एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे. कशाप्रकारे शिवसेनेचा अपमान झाला आणि दिलेला शब्द भाजपने पाळला नाही. याविषयी एकनाथ शिंदे यांना कल्पना आहे. त्यामुळे याबद्दल त्यांची नवीन भूमिका काय मला माहिती नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपाशी शिवसेनेची युती शक्य नाही असे सूचित केले.

दरम्यान, एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 15 मिनिटे फोनवर चर्चा झाली.
यावेळी त्यांनी तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो असं संतापून म्हणाले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप,
तिसरीकडे गटनेते पदावरून (Group Leader) काढलं असं का केलं? यावेळी शिंदे म्हणाले,
मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावरून काढलं का?
संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसार माध्यमांसमोर माझ्या विरोधात बोलतायेत.
भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायेत.

मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतात असा सवाल करत त्यांनी संजय राऊत यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut warns eknath shinde maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

 

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

 

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत