Sanjay Raut | फडणवीसांकडून ‘लाउडस्पीकर’ असा उल्लेख; संजय राऊत म्हणाले – ‘काय पिपाण्या, सनई चौघडे….’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाऊडस्पीकर असा उल्लेख करत केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला शिवसेना खासदार (Shievsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचा लाउडस्पीकर (Loudspeaker) हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील असं संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. भाड्याचे भोंगे आणि लाउडस्पीकर यात फरक असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आम्ही भाजपप्रमाणे सरकार कोसळेल असं लाउडस्पीकर वरून सांगणार नाही. त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. पण हे सरकार टिकणार नाही, बहुमत गमावेल, अंतर्गत कलहाने पडेल. कोणाला काय बोलायचं आहे, पिपाण्या वाजवायच्या आहेत, सनई चौघडे वाजवायचे आहेत ते वाजवू द्या. आमच्या लाउडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेचा लाउडस्पीकर 56 वर्षे सुरु आहे.
यावरील संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी महाराष्ट्र आणि देश एक निष्ठेने शिवसेनेच्या मागे उभा आहे.
आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यानंतरही तुम्ही ‘एक दुजे के लिये’ स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात.
किती वेळ दिल्ली जाणार आहेत? असा सवाल राऊतांनी केला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay rauts reply to bjp devendra fadnavis and mns raj thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा