Sanjay Raut | संजय राऊतांकडे CM एकनाथ शिंदे यांचे 10 लाख रुपये ?, दीपक केसरकर म्हणाले…

0
362
Sanjay Raut shivsena rebel group eknath shinde group leader deepak kesarkar on money found in sajay raut home in shinde name
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरातून ईडीने (ED) जप्त केलेल्या रक्कमेपैकी (Amount Forfeited) दहा लाख रुपयांची रक्कम ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावावर असल्याचे समोर आले. यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Shinde Group Spokesperson Deepak Kesarkar) यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिंदे यांच्या विरोधात अयोध्येत (Ayodhya) जाऊन काही कारवाई करायची असेल म्हणून ती रक्कम असावी असे केसरकरांनी सांगितले.

 

रविवारी सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. त्यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी ईडीने काही कागदपत्रे आणि साडे अकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यातील 10 लाख रुपयांवर एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर उरलेले दीड लाख रुपये हे राऊत यांचे असून ते घरखर्चासाठी आणले होते, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली.

 

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले,
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अयोध्येत काही करायचे असेल म्हणून ते पैसे काढले असावेत.
ईडीला या पैशांचा स्त्रोत दाखवावा लागणार असून राऊत हा स्त्रोत दाखवतील.
राज्यात ईडीने केलेल्या 90 टक्के कारवाया या बिल्डर विरोधात आहेत. तर 10 टक्के कारवाया राजकीय नेत्यांविरोधात असल्याचे केसरकरांनी सांगितले.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत (Praveen Raut) यांना चार महिन्यापूर्वी अटक (Arrest) केली होती.
त्यानंतर संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. परंतु त्यांनी सतत चौकशीसाठी वेळ मागून घेतली.
अशी वेळ मारणे चुकीचे आहे, यातून साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो असेही केसरकरांनी म्हटले.

 

शिंदे गटातील काही आमदार ईडीच्या रडारवर असल्याबाबत केसरकरांना विचारण्यात आले.
यावर बोलताना ते म्हणाले, ईडी चौकशी करणे म्हणजे कारवाई सुरु आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.
आम्ही केलेला उठाव हा शिवसेना वाचवण्यासाठी केला होता. त्याचा आणि चौकशीचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
आमची लढाई शिवसेनेच्या अस्तित्वाची असून ईडीला घाबरून आमच्याकडे कोणी आलेले नाही, असेही केसरकरांनी स्पष्ट केले.

 

Web Title : – Sanjay Raut | shivsena rebel group eknath shinde group leader deepak kesarkar on money found in sajay raut home in shinde name

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा