Sanjay Raut | ED ला न्यायालयाचा दणका, संजय राऊतांच्या जामिनाच्या स्थगितीची मागणी फेटाळली; होणार आजच सुटका

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) जून महिन्यापासून गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या (ED) अटकेत होते. त्यांना विशेष सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठाडी (Judicial Custody) सुनावली होती. आज अखेर संजय राऊत (Sanjay Raut) यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला स्थगिती मिळावी, अशी मागणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) न्यायालयात केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळत राऊतांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे राऊत यांची आजच (दि. 09) सुटका होणार आहे. दुपारी तीन वाजता या खटल्यावर सुनावणी पार पडली. यावेळी ईडीने जामीनाला नकार दिला होता. तसेच जामीन अर्जावर स्थगितीची मागणी केली होती. न्यायालयाने स्थिगिती देण्यास नकार दिला आणि राऊत यांच्या सुटकेवर शिक्कामोर्तब केला आहे. दोन लाखांच्या जातमुचल्यावर संजय राऊत आणि प्रवीण राऊत (Pravin Raut) यांची सुटका करण्यात येणार आहे. संजय राऊत जून महिन्यापासून आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने जल्लोष केला आहे.

संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात आज ईडी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जाणार आहे.
त्यामुळे उच्च न्यायालय या निकालाला स्थिगिती देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राऊतांच्या सुटकेवर प्रतिक्रिया
दिली आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा सण आहे. शिवसैनिकांमध्ये हजार हत्तींचे बळ आज आले आहे.
आजचा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आहे. आमचा सेनापती परत आला आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

Web Title :-  Sanjay Raut | shivsena sanjay raut bail pmla court denied ed and granted bail to sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | सावधान रहो शेर आ रहा है, संजय राऊतांच्या जामीनानंतर भास्कर जाधवांचे विरोधकांना खुले चॅलेंज

Bindi Controversy | अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने टिकली प्रकरणावर केली ‘ही’ पोस्ट, सोशल मीडियावर होत आहे व्हायरल