Sanjay Raut | ‘…तर सरकार कोसळेल’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद सुरु झाला आहे. शिंदे गट (Shinde Group) विरुद्ध उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) असं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे गटातील नेते, कार्यकर्ते पुढे येत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

 

घटनेचा पेच निर्माण झाल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अद्याप झालेला नाही असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या युतीवर त्यांनी निशाणा साधला आहे. 15 दिवसानंतरही मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही ? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार हा राष्ट्रपतिपदाची निवडणूक (Presidential Election) झाल्यानंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी विकास निधी थांबवणे चुकीचे आहे.
विकास कामांसाठी निधी दिला असेल तर थांबवणे योग्य नाही, असे राऊत म्हणाले.

 

मला घटनाच नाही तर दुर्घटना पण माहीत आहे. घटनेला नैतिकतेचा आधार असतो.
हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभं आहे का ? 15 दिवसानंतरही मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही ? 40 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळ स्थापन केलं तर सरकार कोसळेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena sanjay raut on eknath shinde devendra fadnavis goverment maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा