Sanjay Raut | गोवा विधानसभा निवडणुकीपुर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनात..’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | नुकतंच पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या गोवा विधानसभा निवडणूकीत राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या 3 पक्षांच्या आघाडीच्या धर्तीवर गोव्यात युतीचा नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असली तरी काँग्रेस सोबत नसणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली.

 

काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘गोव्यात महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की ते गोव्यामध्ये स्वबळावर सत्ता आणू शकतात.
त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत.
काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष आहे.
आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे.’ असं ते म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या सभा पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्षांनी घेतल्या.
तिसऱ्या लाटेचा जोर दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त आहे.
महाराष्ट्रात आकडे भयावह आहेत तर उत्तर प्रदेशात रुग्णांची नोंदच होत नाही.
त्यामुळे पुढच्या महिनाभरात उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येत नाही.
निवडणूक आयोगाने आरोग्य विभागाबरोबर चर्चा केल्याचे म्हटले.
पण हा काही उपाय नाही. निवडणुका वेळेत जाहीर केल्या आहेत पण लोकांचे प्राण महत्त्वाचे आहेत.
अनेकदा निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलल्या जातात. पण कोणाला तरी घाई झाली आहे पटकन निवडणुका घेण्याची.’ असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ‘पंजाब, उत्तर प्रदेश, मनीपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठिक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Sanjay Raut | shivsena sanjay raut reaction before the assembly elections in goa said congress mind

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

 

Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

 

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट आजचे दर