Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा जे सरकार बचाव करत आहे, ते सीमावासियांना काय न्याय देणार, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटले आहे. बेळगाव सीमा प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. सीमावासियांना हे सरकार न्याय देऊ शकत नाही, असे म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारला लक्ष्य केले आहे.

संजय राऊत यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कधीही बेळगावला भेट दिली नाही. त्यांनी सीमा प्रश्नावर कधीही प्रभावी भूमिका घेतली नाही. सध्याच्या सरकारमधील एकही मंत्री कधी बेळगावला गेला नाही. यावर्षी झालेल्या मराठी भाषिकांच्या आंदोलनात राज्यातील एकही मंत्री सहभागी नव्हता. एकनाथ शिंदे ज्यावेळी आमच्यासोबत होते. तेव्हा त्यांना आम्ही अनेकवेळा बेळगावला जाण्यास सांगितले होते. पण त्यांनी दरवेळी दुर्लक्ष केले. बेळगावमधील मराठी भाषिकांविषयी राज्य सरकारला काही भावना असतील, तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटक सरकारसोबत चर्चा करुन बेळगाव आणि सीमा भागात मराठी तरुणांवर, आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेण्याची चर्चा करावी. मराठी भाषिक तरुणांवर कर्नाटक सरकारने (Karnataka Government) खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) दबाव निर्माण केला पाहिजे. त्यामुळे कर्नाटकाला देखील कळेल, की महाराष्ट्र मराठी तरुणांच्या पाठिशी उभा आहे, असे यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

पण, जे सरकार राज्यात शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पाठिशी घालत आहे,
ते काय सीमावासियांना न्याय देणार? मुख्यमंत्री बेळगाव आणि सीमाप्रश्नावर पंतप्रधानांसोबत चर्चा करणार
असल्याचे समजते. या बैठकीचे चित्रिकरण करण्यात यावे. या बैठकीत काय चर्चा झाली,
याची माहिती महाराष्ट्र आणि बेळगाव वासियांना कळाली पाहिजे.
आमचे कानडी बांधवांशी आणि कर्नाटक राज्यासोबत भांडण नाही.
मात्र, मराठी भाषकांवरील अन्यायाचा प्रश्न देखील महत्वाचा आहे,
असे यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Web Title :- Sanjay Raut | shivsena thackeray faction leader sanjay raut slams shinde fadnavis led government on belgaum border issue maharashtra politics

Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत